मैत्री म्हणजे काय हा प्रश्न कधी कोणी विचारला तर त्याचं ठोस असं उत्तर कोणाकडेच नसतं. जितकी मैत्री जुनी तितक्या आठवणी, अनुभव, सगळंच जुनं. मैत्री कशी असावी असा जेव्हा कोणाला प्रश्न विचारला जातो तेव्हा अनेकदा ती कृष्ण आणि सुदाम्यासारखी असंच काहीसं उदाहरण दिलं जातं. कृष्णाने आठवण काढावी आणि सुदाम्याला उचकी लागावी. आता अशी मैत्री राहिली तरी कुठे असं तुम्ही म्हणाल पण असं नाहीये.. आजही अशी मैत्री आहे जी प्रसिद्धी, पैसा, समृद्धी या पलिकडची आहे. अशीच एक मैत्री म्हणजे विजय पाटकर, जयवंत वाडकर, विजय कदम आणि प्रिया बेर्डे यांची… आपल्या या ३५ वर्षांहूनही अधिक मैत्रीच्या आठवणी उलगडून सांगतायेत अभिनेते जयंत वाडकर…

मी आणि विजय आम्ही कॉलेज दिवसांपासून एकत्र आहोत. तो मला एक वर्ष ज्युनिअर होता. मी, विजय पाटकर, प्रशांत दामले, प्रदीप पटपर्धन आम्ही सर्व सिद्धार्थ कॉलेजचे विद्यार्थी. कॉलेजपासूनची आमची मैत्री आहे. सिनेसृष्टीत लोकं आम्हाला वाड्या- पाट्या या नावानेच ओळखतात. मला आजही विजयला भेटलेला तो पहिला दिवस आठवतोय. चार्ली चापलीनसारखी हुबेहुब भूमिका करणारा एक मुलगा आमच्या नंतरच्या बॅचमध्ये होता हे आम्ही ऐकून होतो. त्यामुळे कॉलेजच्या एका एकांकीकेत काम करण्यासाठी म्हणून मी त्याला बोलवायला गेलो होतो.

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

तालमीच्या पहिल्या दिवशी तो उत्साहाने आला. तेव्हा सतीश पुळेकर आम्हाला शिकवायचे. पुळेकरांची शिस्त पाहून तो पहिल्याच दिवशी पळून गेला होता. अनेक इंटर कॉलेज स्पर्धा आम्ही तेव्हा गाजवल्या होत्या. सिद्धार्थ कॉलेजचं नाव घेतलं की तेव्हा लोकं घाबरायची.

विजयसोबतची मैत्री तिथ पासूनचीच आहे. तुम्ही कुठे चुकता हे तो मला केव्हाही सांगू शकतो आणि मी ते ऐकतोही, यालाच तर मैत्री म्हणतात. आमच्यात वादही खूप झाले अजूनही होतात पण त्याने आमची मैत्री कधी कमकूवत झाली नाही उलट पक्कीच झाली. ‘तुझ्या वाचून करमेना’ हा आम्हा दोघांचा पहिला सिनेमा होता. आमच्या दोघांसोबत नंतर विजय कदम आणि लक्ष्मीकांत बेर्डेही जोडले गेलो.

नुकतेच माझे कुटुंब, विजय पाटकर, विजय कदम आणि प्रिया बेर्डेचं कुटुंब एकत्र आलो होतो. लक्ष्मीकांत असताना त्याच्या घरी अनेक सणांना जाणं असायचं. होळीला त्याच्या घरी हमखास जायचो. तो असताना फिरायलाही आम्ही सर्वजण खूपदा जायचो. पण तो गेल्यानंतर एकत्र असं फिरायला जाणं झालंच नाही. सुमारे आता १६-१७ वर्षांनी आम्ही सगळे फिरायला गेलो. ते जूने दिवस नव्याने जगलो. प्रियाचा वाढदिवस, माझ्या लग्नाचा वाढदिवस यामुळे हो योग जुळून आला. आमची ही छोटेखानी ट्रीप खूप खास होती. आज आम्ही तिघंही कुठेही असलो, कोणत्याही कामात असलो तरी १५ दिवसांमधून एकदा तरी भेटतोच. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आमच्या तिघांची साथ कधीच सुटली नाही.

आमची ही मैत्री आता आमच्या मुलांमध्येही दिसून येते. गंधार, शार्दुल, स्वामिनी, स्वानंदी, अभिनय आज ही मुलंही एकमेकांसोबत तेवढीच कनेक्ट आहेत. मैत्री आधीची असो किंवा आजची ती कधीच बदलत नाही. ती तेव्हाही जपावी लागत होती ती आताही जपावीच लागते, माणूस बदलला की समीकरणं बदलतात असं मला वाटतं. त्यामुळे सध्याच्या काळात मैत्री जपणं फार महत्त्वाचं आहे.

मी आणि पाटकरने अनेक सिनेमांत एकत्र काम केलंय. अनेकदा व्हायचं असं की आम्ही दोघं एका सिनेमाचं चित्रीकरण करत असताना दिवसभरात किती सीन करायचे आहेत हे आम्हाला आधीच कळायचं. दुसरीकडे लक्ष्याचं वेगळ्याच सिनेमाचं चित्रीकरण सुरू असायचं. पण अनेकदा दुपारच्या जेवणानंतर दिग्दर्शकाकडून आमचं पॅकअप झाल्याचं सांगण्यात यायचं. कारण विचारलं तर लक्ष्याचा फोन आला होता असं सांगण्यात यायचं.

मी, पाट्या, विजय कदम, विनय येडेकर आम्ही सगळे संध्याकाळी लक्ष्याच्या घरी जायचो आणि क्रिकेटचा सामना एकत्र पाहायचो. ते दिवस फारच सुंदर होते. कित्येक वेळा आम्ही लक्ष्याच्या घरीही राहिलो आहोत. हे आता सगळं बोलतानाही ते दिवस डोळ्यांसमोर अगदी लख्खं येतात. असे जीवाला जीव लावणारे मित्र सर्वांनाच मिळो…

शब्दांकन – मधुरा नेरुरकर

madhura.nerurkar@loksatta.com