News Flash

Video : हार्दिक पांड्याच्या गर्लफ्रेंडचे आयटम साँग पाहिले का?

हार्दिकने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत नात्याची कबूली दिली आहे

हार्दिक खेळासोबतच त्याच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता पर्यंत अनेक बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक अभिनेत्री उर्वशी रौतेलाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण उर्वशीने हार्दिक तिचा बॉयफ्रेंड नसल्याचे सांगत अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लावला होता. आता हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डेट करत असलेल्या अभिनेत्रीचा फोटो शेअर केला आहे.

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टेनकोविकसोबतचा फोटो शेअर करत नात्याची कबूली दिली आहे. त्याने फोटो शेअर करत “माझ्या फायरवर्कसोबत नवीन वर्षाची सुरुवात” असे कॅप्शन दिले आहे. पण हार्दिकची गर्लफ्रेंड नताशाने कोणत्या चित्रपटांमध्ये काम केले आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

आणखी वाचा : प्रेमाची कबुली ! हार्दिक पांड्याला ‘या’ अभिनेत्रीनं केलं क्लीन बोल्ड, पाहा फोटो

नताशाने आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिने सत्याग्रह चित्रपटात आयटम सॉंगवर नृत्य केले आहे. त्यानंतर ती डिजे वाले या गाण्यात देखील दिसली होती. त्यानंतर तिने ‘7 Hours to Go’, ‘फुकरे’ चित्रपटातील ओ मेरी मेहबुबा या गाण्यावर नृत्य केले आहे. तसेच तिने छोट्या पडद्यावरील ‘नच बलिये’ या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 4:58 pm

Web Title: hardikn pandya girlfriend itme song avb 95
Next Stories
1 “… तर मी आत्महत्या करेन”; चाहत्याची शाहरुखला धमकी
2 प्रिती झिंटाने दिल्या नववर्षाच्या शुभेच्या; व्हिडीओ व्हायरल
3 अभिनेत्रींनी स्वीमसूटमध्ये दिली ‘नागिन ५’साठी ऑडिशन; व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X