एकता कपूरची बहुचर्चित मालिका ‘कसौटी जिंदगी की’ एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १० सप्टेंबरपासून ही मालिका छोट्या पडद्यावर येत असून एरिका फर्नांडिस आणि पार्थ समथान यांची प्रेरणा आणि अनुराग या भूमिकांसाठी निवड झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली. मात्र मालिकेतील प्रसिद्ध खलनायिका कोमोलिकाच्या भूमिकेत कोण झळकणार याबाबत अजूनही संभ्रम आहे.

अभिनेत्री हिना खान कोमोलिकाची भूमिका साकारणार असं म्हटलं जात होतं. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती. त्यामुळे कोमोलिकाच्या भूमिकेबाबत कमालिची गुप्तता एकता कपूरकडून पाळण्यात येत असल्याचं दिसतंय.

https://www.instagram.com/p/BmaAYyRg-37/

‘Gold’ Box Office: पहिल्या दिवशीच्या कमाईने ‘गोल्ड’ने गाठली ही उंची

कोमोलिकाच्या कट कारस्थानाबरोबरच तिची स्टाईल, मालिकेत तिच्या एण्ट्रीवर येणारं विशिष्ट म्युझिक हेही त्यावेळी खूपच गाजलं. आजही या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी उर्वशी ढोलकिया याच नावानं ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी एकता कपूरने उर्वशी ढोलकिया, अंकिता पटेल आणि क्रिस्टल डीसूझा यांच्यासोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ‘कोमोलिकाच्या भूमिकेसाठी यांची मदत घेत आहे,’ असंही तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी व्हॅनिटी व्हॅनमधील क्रिस्टलने शेअर केलेला फोटो पाहून तीच कोमोलिकाची भूमिका साकारणार की काय असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता या भूमिकेवरून पडदा येत्या काही दिवसांत उचलण्यात येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये त्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.