गेल्या वर्षात बॉलिवूडचा ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्या प्रेमाची बरीच चर्चा रंगली. न्यू यॉर्कमध्ये हे दोघं एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या प्रेमाच्या चर्चांना अधिकच उधाण आले. एकप्रकारे जणू त्यांनी स्वतःच त्यावेळी आगीत तेल ओतल्यासारखी स्थिती होती. रणबीर आणि माहिराचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. यात दोघही धुम्रपान करताना दिसले होते. पण आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जातेय.

वाचा : महाराष्ट्र बंदवर संतापले बॉलिवूडकर

सध्या रणबीरच्या लग्नाची बरीच चर्चा होत असून, तो अरेन्ज मॅरेज करणार असल्याचे म्हटले जातेय. रणबीरसाठी त्याची आई आणि अभिनेत्री नीतू सिंग या मुलीच्या शोधात असल्याचे म्हटले जातेय. या प्रकारामुळे रणबीर-माहिराच्या नात्यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्याचसोबत या दोघांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा होण्यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे माहिराने नुकतीच दिलेली मुलाखत.

‘तू प्रेमात पडली आहेस का’, असा सवाल करण्यात आला असता ती म्हणाली की, ‘नाही, मी आधी प्रेमात होते. प्रेम म्हणजे शांती हे मला आता कळले आहे. प्रेम तेव्हाच असतं जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत असता. तुम्ही एकमेकांसोबत असल्यावर त्यावेळी संभाषण नाही झाले तरी काही फरक पडत नाही. त्या व्यक्तीचे तुमच्यासोबत असणेच पुरेसे असते.’ माहिराचे हे वक्तव्य कुठेतरी त्यांच्या ब्रेकअपची चाहूल देते.

वाचा : ऐश्वर्याच्या मुलाचा हट्ट; उत्तर मिळाल्यावरच घरी परतेन

दरम्यान, माहिराने धुम्रपान केल्यामुळे आणि तोकडे कपडे घातल्यामुळे तिला अनेकांच्या रागाचा सामना करावा लागला होता. त्यावर रणबीर म्हणालेला की, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची काही मुल्यं, मतं असतात. तसेच, प्रत्येकजण आपल्यापरिने एखाद्या गोष्टीचा अर्थ लावत असतो. तुम्ही दुसऱ्यांचे ऐका पण त्याप्रमाणे वागलेच पाहिजे असे नाही. शेवटी, जगा आणि जगू द्या हाच मूलमंत्र महत्त्वाचा आहे. जगात इतरही महत्त्वाच्या गोष्टी असून, त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. माहिरा एक उत्तम अभिनेत्री आहे. लोकांनी तिला समजून घेण्याची गरज आहे. यानंतर माहिरा यावर बराच काळ गप्प राहिली आणि एकेदिवशी तिने आपले मौन सोडले. ती म्हणाली की, ‘सुरुवातीला मी गप्पच राहणे पसंत केले. पण खासगी गोष्टी सार्वजनिक झाल्या त्यामुळे मला बोलणे भाग पडले. एखाद्याच्या खासगी मुद्द्यावर इतकी चर्चा होणे, टीका होणे कोणासाठीच चांगले नाही.’ पण, त्यानंतर माहिरा तिच्या भूमिकेवर ठाम राहिली नाही आणि झालेल्या चुकीसाठी मी माफी मागते असे ती म्हणाली.