News Flash

इंग्लंडच्या विजयावर हेजलचा षटकार; सांगितले पती युवराजचे भन्नाट लॉजिक

सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं.

हेजल आणि युवराज सिंग

सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय प्राप्त करत विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली. अशा या थरारक लढतीत सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकल्याच्या प्रमाणावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. या विजयानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ‘नशिबाची साथ जेव्हा असते तेव्हा काय कमाल घडू शकते,’ असं मत अनेकांनी व्यक्त केलं. इंग्लंडला नशिबाची साथ होती पण न्यूझीलंडचा खेळ जबरदस्त होता या मताशी अनेकजण सहमत आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना अत्यंत रंगतदार होता आणि या सामन्यानंतर क्रिकेटर युवराज सिंगची पत्नी हेजल कीच हिने इन्स्टाग्रामवर केलेलं पोस्ट चर्चेचा विषय ठरला आहे.

‘तुमचं नशीब चांगलं असेल तर काहीही घडू शकतं,’ हे युवराजचं नेहमीचं वाक्य आहे आणि आज मी त्याच्याशी सहमत आहे, असं म्हणत हेजलने इंग्लंडला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे न्यूझीलंडची खेळीसुद्ध अफलातून होती, असंही ती म्हणाली. ‘माझ्या मनात इतकी देशभक्तीची भावना याआधी कधीच नव्हती आणि माझ्या पूर्ण आयुष्यात एखादा खेळ बघताना मी इतका ताण कधीच घेतला नव्हता,’ असं तिने इन्स्टाग्रामच्या पोस्टवर लिहिलंय.

World Cup 2019 Final: बावळट नियम, लढवय्ये न्यूझीलंड अन् बरंच काही, पाहा सेलिब्रिटी काय म्हणाले..

क्रिकेटची फार आवड नसतानाही विश्वचषकाचा सामना पाहणं अत्यंत मनोरंजक होतं, हे तिने आवर्जून सांगितलं. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला आहे. तर न्यूझीलंडला वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 12:19 pm

Web Title: hazel keech post on instagram after england won cricket world cup 2019 ssv 92
Next Stories
1 Video : ‘काहे दिया परदेस’ची सायली घेणार प्रेमाचा ‘यू टर्न’
2 VIDEO: विशेष संदेशासह सलमानने पूर्ण केलं ‘बॉटल कॅप चॅलेंज’
3 World Cup 2019 Final: बावळट नियम, लढवय्ये न्यूझीलंड अन् बरंच काही, पाहा सेलिब्रिटी काय म्हणाले..
Just Now!
X