जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी करोनाला रोखण्यासाठी हवन करण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांनी तो डिलिट केला. पण या व्हिडीओमुळे हेमा मालिनी यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हेमा मालिनी यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओमध्ये त्यांनी वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी आणि करोनासारख्या अनेक आजारांपासून स्वत: ला वाचवण्यासाठी घरी हवन करण्याचा सल्ला हेमा मालिनी यांनी दिला होता. त्यांनी दिलेला हा अजब सल्ला पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.

hema malini havan statement, hema malini video, hema malini covid 19 havan bollywood, Hema Malini,

एका यूजरने ‘दाक्षिणात्य अभिनेत्री हुशार असतात पण या त्यांच्यामधील नाहीत’ असे म्हटले आहे.

hema malini havan statement, hema malini video, hema malini covid 19 havan bollywood, Hema Malini,

तर दुसऱ्या एका यूजरने ‘चुकीची माहिती पसरवू नका’ असे म्हणत हेमा मालिनी यांना ट्रोल केले आहे.

काय म्हणाल्या होत्या हेमा मालिनी?

“मी गेल्या अनेक वर्षांपासून पुजा झाल्यानंतर हवन करते आणि करोना व्हायरस आल्यापासून मी दिवसातून दोनदा हवन करते. यामुळे वातावरण फक्त शुद्ध होतं नाही तर पवित्र वाटतं आणि करोना सारख्या संसर्गाला आपल्यापासून दूर ठेवते. आज संपूर्ण जग हे करोनासारख्या भयानक व्हायरसचा सामना करत आहे. मी सगळ्यांना विनंती करते की फक्त जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त नाही तर जो पर्यंत आपण करोना संसर्गावर मात करत नाही तो पर्यंत रोज हवन करा. याच्याशी कोणत्याही धर्म किंवा जातीचा संबंध नाही” असे हेमा मालिनी म्हणाल्या होत्या.