04 March 2021

News Flash

Then and Now… फोटो शेअर करत हेमा मालिनी यांनी धरम पाजींना दिल्या खास शुभेच्छा

वाढदिवसाच्या निमित्तानं हेमा मालिनी यांनी शेअर केला धर्मेंद्र यांचा तरुणपणीचा फोटो

बॉलिवूडचे अॅक्शन हिरो धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. ८५व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. धर्मेंद्र यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील आपल्या अनोख्या शैलीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी धर्मेंद्र यांचा तरुणपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा थ्रोबॅक फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “भावा तूच खरा रॉकस्टार'”; कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा

“आज आम्ही धर्मेंद्र यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. हे चाहत्यांचं प्रेम आहे जे आजही आमचे चित्रपट पाहतात अन् स्तुती करतात. तुमच्यामुळेच आजही प्रत्येक क्षण जसाच्या तसा आमच्या स्मरणात आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन हेमा मालिनी यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय धर्मेंद्र यांचा लहान मुलगा बॉबी देओल याने देखील एक जुना फोटो शेअर करुन वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अवश्य पाहा – “याला म्हणतात आत्मसन्मान”; ते दृश्य पाहून प्रकाश राज यांनी केलं शेतकऱ्यांचं कौतुक

धर्मेंद्र यांचं खरं नाव धरम सिंह देओल असं आहे. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ साली झाला होता. त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक होते. त्यांनी १९६० साली अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. १९७० साली त्यांना जगातील सर्वात हँडसम पुरुषांमध्ये स्थान मिळालं होतं. शिवाय वर्ल्ड आयर्नमॅन या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. ‘सत्यकाम’, ‘खामोशी’, ‘शोले’, ‘क्रोधी’, ‘यादों की बारात’ यांसारख्या अनेक सुपहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 4:18 pm

Web Title: hema malini shares pictures with dharmendra on his birthday mppg 94
Next Stories
1 ऐश्वर्या- माधुरीचा सेटवर मजामस्ती करतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल
2 …म्हणून शर्मिला यांना वाटते तैमूरची चिंता
3 CID बंद का केलं? इन्स्पेक्टर दया म्हणाला….
Just Now!
X