News Flash

सलमान नाही तर हा आहे रिअल ‘टायगर’

'टायगर जिंदा है'मध्ये अफलातून स्टंट्स करणारा हा 'अवलिया'

'टायगर जिंदा है' मधील सलमानचे स्टंट्स करण्यासाठी 'बॉडी डबल'चा वापर करण्यात आला.

गेल्या वर्षाच्या अखेरीस सलमान खानचा बहुचर्चित ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफीसवर या चित्रपटाने तुफान कमाई केली. पाच वर्षांनंतर पाहायला मिळालेली सलमान- कतरिनाची जोडी, सलमानचा अॅक्शन अवतार आणि जबरदस्त स्टंट्स ही कारणं चित्रपटाच्या यशाला कारणीभूत ठरली. मात्र यामध्ये अफलातून स्टंट्स करणारा सलमान नाही तर दुसराच व्यक्ती आहे.

‘टायगर जिंदा है’ मधील सलमानचे स्टंट्स करण्यासाठी ‘बॉडी डबल’चा वापर करण्यात आला. हा बॉडी डबल आहे परवेझ काझी, जो हुबेहूब सलमानसारखा दिसतो. परवेझने या चित्रपटासोबतच ‘दबंग २’, ‘बजरंगी भाईजान’, ‘प्रेम रतन धन पायो’ आणि ‘ट्युबलाइट’मध्येही काही स्टंट सीन केले आहेत. अनेकदा जीव धोक्यात टाकून परवेझने सलमानच्या स्टंट्ससाठी शूटिंग केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले हे फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल! सलमानच्या आगामी ‘रेस ३’ या चित्रपटासाठीदेखील परवेझ सलमानचा बॉडी डबल म्हणून काम करणार आहे.

वाचा : ‘झिरो’वरून ट्रोल झाला सुपस्टार हिरो

‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जोरदार कमाई केली आहे. ४२३.५९ कोटींची घसघशीत कमाई करणारा ‘टायगर जिंदा है’ आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार प्रदर्शन करणारा सातवा चित्रपट ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2018 4:03 am

Web Title: here is the real tiger who made salman khan action enthralling in tiger zinda hai
Next Stories
1 …म्हणून विराट कोहली साखरपुड्याची अंगठी गळ्यात घालतो
2 ‘न्यूड’बद्दलचे धुके निवळेल
3 नाटक बिटक : एकांकिका स्पध्रेतून थेट व्यावयायिक रंगभूमीवर!
Just Now!
X