20 March 2019

News Flash

अजय देवगणच्या हेलिकॉप्टरला अपघात; जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजमागील सत्य

महाबळेश्वरजवळ अजयच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचा व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल

अजय देवगण

अभिनेता अजय देवगणच्या चार्टर्ड हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचा एक व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल होत असून ती अफवा असल्याची माहिती महाबळेश्वर पोलिसांनी दिली आहे. महाबळेश्वरजवळ हा अपघात झाल्याचा मेसेज मिळाल्याने पोलिसांनी तातडीने चौकशीला सुरुवात केली होती. मात्र, ती अफवा असल्याचं लक्षात आल्यानंतर मेसेज कोणाकडून पाठवण्यात आला याचा तपास पोलीस करत आहेत.

‘महाबळेश्वर किंवा जवळपास अजय देवगणच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असता तर आम्हाला त्यासंदर्भात माहिती मिळाली असती. अशी कोणतीच घटना घडली नाही. आठवड्याभरापूर्वी असाच मेसेज व्हायरल झाला होता आणि रविवारपासून तो पुन्हा व्हायरल होत आहे. ही अफवा पसरवण्यामागे कोण आहेत, याचा आम्ही शोध घेत आहोत,’ अशी माहिती महाबळेश्वर पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

वाचा : जेव्हा माधुरीने फोटोशूटमध्ये तब्बल १२० रिटेक घेतले

शूटिंग संपल्यानंतर महाबळेश्वरहून परतताना अजयच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून पायलटचा जागीच मृत्यू झाल्याचा खोटा मेसेज व्हायरल झाला होता. सेलिब्रिटींसंदर्भातील अशा अफवा आणि खोटे मेसेज व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अशा वेळी व्हायरल होत असलेल्या मेसेजला फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याच्या सत्यतेची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरते.

First Published on May 15, 2018 1:06 pm

Web Title: here is the truth behind whats app hoax message circulating ajay devgn helicopter crash near mahabaleshwar