12 November 2019

News Flash

इम्रान खानच्या घटस्फोटाच्या बातमीवर सासू म्हणते..

अभिनेता इम्रान खान आठ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

इम्रान खान, अवंतिका मलिक

‘जाने तू या जाने ना’, ‘डेल्ली बेल्ली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता इम्रान खान आठ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. इम्रानची पत्नी अवंतिका मलिक मुलगी इमारासोबत त्याचं पाली हिल्सचं घर सोडून माहेरी परतली असल्याचीही माहिती आहे. पण इम्रान आणि अवंतिका घटस्फोट घेण्याचे वृत्त इम्रानच्या सासूने फेटाळले आहे.

‘इन डॉटकॉम’ला दिलेल्या मुलाखतीत अवंतिकाच्या आईने त्या दोघांमध्ये मतभेद आणि वाद असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र घटस्फोट घेत नसल्याचं स्पष्ट केलं. इम्रान आणि अवंतिकामध्ये वाद आहेत पण हे दोघे घटस्फोट घेणार नाही असं त्या म्हणाल्या.

इम्रान आणि अवंतिका यांनी दहा वर्षांच्या अफेअरनंतर २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तीन वर्षांत त्यांना इमारा ही मुलगी झाली. पण गेले काही दिवस दोघांमध्ये टोकाचे वाद होत आहेत. या वादांमुळेच विभक्त होण्याचा निर्णय दोघांनीही घेतला असल्याची चर्चा होती.

इम्रान खान हा आमिर खानचा भाचा असून २००८ साली ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट सुपरहिट झाला होता पण त्यानंतर मात्र इम्रान बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात अपयशी ठरला. ‘किडनॅप’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘देल्ली बेल्ली’, मेरे ब्रदर कि दुल्हन’, ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते.

First Published on May 22, 2019 3:32 pm

Web Title: here is what avantika malik mother has to say on imran khan and her daughters separation reports