29 May 2020

News Flash

…म्हणून ‘हे’ चित्रपट पाहणं विकी कटाक्षाने टाळतो

विकी लवकरच 'भूत पार्ट वन : द हॉण्टेड शिप' या चित्रपटात झळकणार आहे

विकी कौशल

अॅक्शन आणि कॉमेडीने परिपूर्ण असलेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता विकी कौशल लवकरच एका भयपटामध्ये झळकणार आहे. ‘भूत पार्ट वन : द हॉण्टेड शिप’ (Bhoot Part One : The Haunted Ship) या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे हॉरर चित्रपट करणारा विकी प्रत्यक्षात मात्र भयपट कधीच पाहात नाही. यामागचं कारण त्याने स्वत: सांगितलं आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’नुसार, ‘भूत पार्ट वन : द हॉण्टेड शिप’ या चित्रपटामध्ये व्यस्त असलेला विकी पहिल्यांदाच एका भयपटामध्ये काम करणार आहे. विशेष म्हणजे या भयपटासाठी होकार कळविणारा विकी प्रत्यक्षात मात्र भयपट कधीच पाहात नाही. विकीला भूतांची प्रचंड भीती वाटत असल्यामुळे तो अशा धाटणीचे चित्रपट पाहण्याचं टाळतो.


‘भयपट पाहण्यापूर्वी मी कायम असा विचार करतो की, आता मी मोठा झालो आहे. त्यामुळे हे चित्रपट पाहू शकतो. मात्र प्रत्यक्षात असं काहीच होत नाही. मला हे चित्रपट पाहून भीतीच वाटते’, असं विकी म्हणाला. यावेळी त्याने ‘द कॉन्ज्युरिंग’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याची भीतीने काय अवस्था झाली होतीदेखील त्याने यावेळी सांगितलं. या आगामी चित्रपटामध्ये विकीसोबत अभिनेत्री भूमि पेडणेकर स्क्रीन शेअर करणार आहे.

दरम्यान ‘भूत पार्ट वन : द हॉण्टेड शिप’ या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये विकी एका इंजिनिअरची व्यक्तीरेखा साकारणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 12:56 pm

Web Title: heres why bhoot actor vicky kaushal is not fond of horror movies ssj 93
Next Stories
1 जेनेलियासोबतचे गोड भांडण रितेशने आणलं ट्विटरवर; नेटकरी म्हणाले..
2 बॉलिवूडच्या ‘या’ आठ जोड्या पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर
3 ..अन् करण जोहरला रडू कोसळलं
Just Now!
X