चित्रपटसृष्टी असो किंवा मग मॉडेलिंग विश्व. या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं शारीरिक सुदृढतेकडे जरा जास्त लक्ष असतं. मग ती अभिनेत्री असो, अभिनेता असो किंवा रॅम्पवर चालणारे मॉडेल्स. सा साऱ्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयींची म्हणजेच ‘डाएट’ची. याच सवयीमुळे अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरही एका खास शेफची व्यवस्था केली आहे.

जवळपास गेल्या साडेतीन वर्षांपासून अनुष्काने तिच्या आहारात मांसाहाराचा वापर करणं पूर्णपणे बंद केलं आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळांमध्ये शाकाहारी खाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आगामी चित्रपटाच्या सेटवर तिने खासगी शेफची व्यवस्था केली. त्याशिवाय या चित्रपटाच्या निमित्ताने ज्या हॉटेल्समध्ये अनुष्का राहणार आहे तेथेसुद्धा तिने शाकाहार बनवणाऱ्या शेफची व्यवस्था करण्यावर भर दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. फक्त ‘झिरो’च्याच नव्हे तर आगामी चित्रपटांच्या सेटवरही ‘व्हीगन डाएट’ फॉलो करणाऱ्या अनुष्काने तिच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सातत्य राखण्यासाठी खास शेफची सोय केल्याचं कळत आहे.

पाहा : टेलिव्हिजनची बहुचर्चित जोडी अडकली विवाहबंधनात

सूत्रांचा हवाला देत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अनुष्काने मांसाहाराचा त्याग करत पूर्णपणे शाकाहारी खाण्याला प्राधान्य देण्यामागे आरोग्यदायी सवयींसोबतच आणखी एक कारण होतं. त्या कारणाची पाळंमुळं तिच्या धार्मिक समजुतींशीही जोडली गेली आहेत. कधीची शाकाहारापासून मागे हटणार नाही, अशी प्रतिज्ञाच जणू अनुष्काने घेतल्यामुळे सध्या हा सर्व खटाटोप सुरु आहे.