बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी नुकतीच दोन जुळ्या बाळांची आई झाली. यापूर्वी तिला निशा नावाची एक लहान मुलगीही आहे. निशाला सनीने दत्तक घेतल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चांना सनीने पूर्णविराम दिला आहे. सध्या सनी तिच्या नव्या चित्रपटाच्या तयारीत असून या चित्रपटामध्ये ती झळकणार असली तरी एक व्यक्तीने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.

सनी लिओनीच्या जीवनावर आधारित ‘किरनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या सनीच्या जीवनपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये सनीची व्यक्तिरेखा सनी स्वत: पार पाडणार आहे. तर डॅनिअलच्या भूमिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा अभिनेता मार्क बुकनर याची निवड करण्यात आली आहे. डॅनिअलच्या भुमिकेसाठी प्रथम खुद्द डॅनिअललाच विचारण्यात आले होते. मात्र त्याने नकार दिल्यामुळे या चित्रपटात मार्क बुकनर हा झळकणार आहे.

वाचा : VIDEO : सोनमच्या लग्नासाठी सेलिब्रिटी लागले तयारीला

मला चित्रपटाविषयी विचारणा केल्या तेव्हाच मी माझा नकार कळविला होता. मला अभिनयापेक्षा माझ्या कंपनीत रोज काम करायला आवडेल. चित्रीकरणासाठी ६०- ९० दिवस देण्यापेक्षा मी तोच वेळा मला जे जमतं त्या कामांमध्ये घालवेल, असे डॅनिअलने सांगितले.

सनीच्या जीवनपटासाठी सहअभिनेता मार्कनेही अभिनयाची जोरदार तयारी सुरु केली असून तो सनीला जाणून घेण्यासाठी रोज तिच्याशी चर्चा करतो एवढंच नाही तर तो डॅनिअलप्रमाणे आपल्या संपूर्ण शरीरावर टॅटू काढून घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सनीने एक पोस्ट शेअर करत चित्रपटातील अनुभव शेअर केला होता. या पोस्टमध्ये तिने हातात एक बोर्ड घेऊन ‘भितीने माझी धडधड वाढली आहे. चित्रपटातील एका सीनमुळे मला आयुष्यातील त्या प्रसंगाला पुन्हा एकदा सामोरे जाण्याची वेळ आली आहे’, असे लिहीले होते. सनीच्या या पोस्टमुळे सनीच्या आयुष्यात नक्की कोणत्या घटना घडल्या हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये कमालीची वाढली आहे.