08 March 2021

News Flash

…म्हणून रजनीकांत-अक्षयच्या ‘२.०’ या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलर १३ सप्टेंबरलाच होणार प्रदर्शित

गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार पुढे ढकलली जात आहे, त्यामुळे चाहतेही नाराज आहेत.

२.० चा टीझर सप्टेंबरमध्ये विशेषत: १३ सप्टेंबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट त्याच्या बिग बजेटमुळे चर्चेत होता. हा चित्रपट कधी एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळतोय याची उत्सुकता चाहत्यांना होती. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार पुढे ढकलली जात आहे, त्यामुळे चाहतेही नाराज आहेत. या चित्रपटाची पहिली झलक ऑगस्टमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार होती. मात्र या चित्रपटाच्या टीझरचं प्रदर्शनही लांबलं आहे त्यामुळे आता ‘२.०’ चा टीझर सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचा टीझर  १३ सप्टेंबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आलायं. याचं कारणंही खास आहे. कारण या दिवशी गणेश चतुर्थी आहे. तेव्हा या शुभमुहूर्तावर बाप्पांचा आशीर्वाद घेऊन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्याचं ठरलं आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनात सतराशेसाठ विघ्न आलीत, तेव्हा विघ्नहर्त्यांचा आशीर्वाद घेऊनचं चित्रपटाचा टीझर या दिवशी लाँच करण्याचा निर्णय एस शंकर यांनी घेतला आहे.

जानेवारी २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र याच महिन्यात ‘पद्मावत’ही प्रदर्शित होणार होता म्हणूनच चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होईल असं जाहीर करण्यात आलं. मात्र एप्रिलमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी २९ नोव्हेंबर २०१८ ही तारीख निश्चित करण्यात आली.

४५० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट जगभरात सुमारे १५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘एंथरिन’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे. अक्षय या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. अक्षयचा हा पहिलाच तामिळ चित्रपट आहे. आता सर्वांनाच या चित्रपटाच्या टीझरची उत्सुकता लागून राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:52 pm

Web Title: heres why teaser of rajinikanth akshay kumar starrer 20 release in september
Next Stories
1 बायोपिकमधून तोच तोच संघर्ष किती वेळा दाखवणार?- दीपिका पदुकोण
2 टीआरपीत अव्वल असलेली ‘ये है मोहब्बते’ घेणार प्रेक्षकांचा निरोप
3 सलमा खान- कतरिना कैफला नेटकऱ्यांनी म्हटलं ‘सासू- सून’; पाहा सलमानची बहीण अर्पिताची प्रतिक्रिया
Just Now!
X