News Flash

‘हिरोपंती २’चं पोस्टर कॉपी केलं? टायगर श्रॉफ झाला ट्रोल

जाणून घ्या काय म्हणाले नेटकरी

आजवर बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत ज्यांचे पोस्टर हे हॉलिवूड चित्रपटांसारखे तयार करण्यात आले होते. अनेकदा नेटकऱ्यांनी ते पोस्टर पाहून चित्रपट निर्मात्यांना ट्रोल देखील केले. आता नेटकऱ्यांनी नुकताच प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘हिरोपंती २’ या चित्रपटाचे पोस्टर हॉलिवूड चित्रपटातून कॉपी केल्याचे म्हणत टायगरला चांगलेच सुनावले आहे

‘हिरोपंती २’ या चित्रपटाचा पोस्टर काल टायगरच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आला होता. टायगरने स्वत: त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले. “माझं पहिलं प्रेम..या आधी कधीन न पाहिलेली अॅक्शन, थ्रील, घेऊन येत आहोत.. ३ डिसेंबरला चित्रपटगृहात”, असे कॅप्शन देते टायगरने हे पोस्टर शेअर केले.

हे पोस्टर शेअर केल्यानंतर लगेच नेटकऱ्यांनी शोधून काढले की हे पोस्टर २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिटमॅन या हॉलिवूड चित्रपटाचे कॉपी केले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी लगेच मीम्स तयार करत टायगरला ट्रोल केले. एक नेटकरी हिटमॅनचे पोस्टर शेअर करत म्हणाला, “हे सारखं दिसत आहे..”, तर दुसरा नेटकरी पोस्टर शेअर करत म्हणाला, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हिटमॅन”

दरम्यान, ‘हिरोपंती 2’ या चित्रपटात टायगर सोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री तारा सुतारिया दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करत असून निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहेत. हा चित्रपट १६ जुलै २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 7:14 pm

Web Title: heropanti 2 poster is copy of hollywood movie hitman dcp 98
Next Stories
1 धकधक गर्लची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एण्ट्री, माधुरी घेणार ‘आनामिका’चा शोध
2 ‘मी माझे तरुणपण पुन्हा जगतो आहे’- दर्शन जरीवाला
3 ‘भाजपाने पोलीस, ईडी, सीबीआय यांचा वापर…’, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत
Just Now!
X