News Flash

Hichki Trailer Out : राणीच्या ‘हिचकी’ची पहिली झलक

यात राणी मुखर्जीचा अभिनय पाहण्याजोगा

राणी मुखर्जी, हिचकी

बरेच दिवस रुपेरी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘यशराज फिल्म्स’ या निर्मिती संस्थेअंतर्गत साकारलेल्या ‘हिचकी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव पाहता काहीतरी वेगळे कथानक प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशीच अनेकांची अपेक्षा होती. प्रेक्षकांच्या याच अपेक्षांची पूर्तता करण्यात राणी मुखर्जी यशस्वी होणार अशीच चिन्हं दिसत आहेत. निदान चित्रपटाचा ट्रेलर पाहून तरी याचा अंदाज लावता येणं सहज शक्य होत आहे.

यशराज फिल्म्सच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ‘उचकी’चादेखील आजार असतो याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. tourettes syndrome नावाच्या या आजाराच्या भोवती या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली असून, ती मोठ्या कलात्मकपणे रुपेरी पडद्यांवर मांडण्यात आली आहे. आत्मविश्वास कमी करणाऱ्या गोष्टींवर मात करत सतत पुढे जाण्याच्या वृत्तीचे दर्शन ‘हिचकी’तून होईल.

वाचा : ‘या’ समस्येशी गेली २२ वर्षे लढतेय राणी मुखर्जी

सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित ‘हिचकी’ चित्रपटामध्ये राणी मुखर्जीचा अभिनय पाहण्याजोगा असेल. एका शिक्षिकेच्या रुपात राणी या ट्रेलरमधून आपल्या भेटीला येते. पण, बोलताना विचित्र पद्धतीने उचक्या येणारी शिक्षिका राणीने सुरेखपणे साकारली असून, अशी शिक्षिका तुम्ही कधी पाहिली आहे का, हाच प्रश्न पडतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 4:02 pm

Web Title: hichki trailer out bollywood actress rani mukerji sails through without hiccups
Next Stories
1 २०१८ मध्ये मिलिंद सोमण करणार लग्न?
2 सलमानची आणखी एक तथाकथित प्रेयसी क्रिकेटरशी वाढवतेय जवळीक
3 ‘विरुष्का’चा हनिमून लाहोर आणि कराचीमध्ये; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Just Now!
X