News Flash

“उंच टाचांच्या चपला महिला विरोधी”; अभिनेत्रीने दिला बुट वापरण्याचा सल्ला

उंच टाचांच्या चपला वापरल्यामुळे महिलांना त्रास होतो.

एवा ग्रीन हॉलिवूड सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. एवा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी एवा चक्क महिलांच्या हाई हील्स चपलांमुळे चर्चेत आहे. अशा प्रकारच्या चपलांना एवाने ‘महिला विरोधी’ असं म्हटलं आहे.

‘जेम्स बॉण्ड’, ‘300: राईज ऑफ एम्पायर’, ‘डार्क शॅडो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेली एवा आपल्या स्टाईलीश अंदाजासाठी ओळखली जाते. परंतु स्टाईलीश दिसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हाई हील्स चपला एवाला महिला विरोधी वाटतात. टाऊन अँड कंट्री या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत एवाने महिलांच्या चपलांवर निशाणा साधला. ती म्हणाली,

“महिलांच्या चालण्यामध्ये मादकपणा येण्यासाठी हाई हील्सच्या चपला वापरण्याचा सल्ला दिला जातो. हे खरं आहे, त्यामुळे महिला अधिक आकर्षक आणि उंच दिसतात. परंतु अशा प्रकारच्या चपला वापरण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. अशा स्त्रियांना वेगाने चालता येत नाही. चालताना थोडं अडखळलं तर पाय मुरगळण्याची शक्यता असते. काही वेळेस टाच फ्रॅक्चर देखील होते. दिर्घ काळ उभं राहाता येत नाही. कालांतराने टाचा दुखु लागतात. टाचांमधील नसा अतिरिक्त ताणल्या गेल्यामुळे रक्त गोठू शकतं. त्यामुळे अशा धोकादायक चपला न वापरण्याचा सल्ला मी इतर महिलांना देईन. त्या ऐवजी बुटांचा वापर करावा. हाई हील्सला मी तर महिला विरोधीच म्हणेन.” असं एवा म्हणाली. एवाला हॉलिवूड सिनेसृष्टीत ‘बॉण्ड गर्ल’ म्हणून ओळखलं जातं. जेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘कॅसिनो रॉयल’ या चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटात तिने आपल्या मादक अंदाजाने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 4:10 pm

Web Title: high heels are anti feminist says eva green mppg 94
Next Stories
1 Video : नजर हटी, दुर्घटना घटी; घरकाम करणारीला किस केल्याने शिल्पा शेट्टीने केली पतीची धुलाई
2 व्हायरसवर आधारित ‘कंटेजन’ चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्याच्या मुलीला करोनाची लागण
3 “नटून-थटून टीव्हीवर येण्यापूर्वी मजुरांचे हाल पाहा”; दिग्दर्शकाचा मोदी सरकारला टोला
Just Now!
X