News Flash

‘बिग बॉस’ फेम हिमांशी खुरानाला करोना; शेतकऱ्यांच्या आंदोलनात झाली होती सहभागी

हिमांशीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली.

हिमांशी खुराना

‘बिग बॉस १३’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली पंजाबी कलाकार हिमांशी खुरानाला करोनाची लागण झाली आहे. हिमांशीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. तिच्या संपर्कात आलेल्यांनाही करोना चाचणी करण्याचा सल्ला तिने या पोस्टमध्ये दिला. पंजाबमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात तिने नुकताच सहभाग घेतला होता.

‘मी तुम्हा सर्वांना हे कळवू इच्छिते की माझा करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. योग्य ती काळजी घेऊनही मला करोना झाला. परवा मी आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यावेळी परिसरात थोडीफार लोकांची गर्दीसुद्धा होती. त्यामुळे मला करोना चाचणी करून घ्यावी असं वाटलं. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या. आंदोलन करणाऱ्यांना मी विनंती करते की करोनाचं संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे कृपया स्वत:ची योग्य ती काळजी घ्या’, असं तिने सोशल मीडियावर लिहिलं.

आणखी वाचा : एनसीबी चौकशीदरम्यान दीपिकाला अश्रू अनावर

शनिवारी हिमांशीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सांगितलं होतं. कोणत्याही प्रसिद्धीसाठी किंवा स्वत:च्या फायद्यासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनात मी सहभागी होणार आहे, असं ती म्हणाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 2:04 pm

Web Title: himanshi khurana tests positive for coronavirus ssv 92
Next Stories
1 “इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात?” जावेद अख्तर यांचा सवाल
2 “सरकारविरोधात आवाज उठवणं म्हणजे देशद्रोह नव्हे”; जावेद अख्तर यांची केंद्रावर टीका
3 Video : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..
Just Now!
X