28 November 2020

News Flash

“मी सत्याच्या बाजूने उभी”; रियाला पाठिंबा देणाऱ्या अभिनेत्रीचं ट्रोलर्सला उत्तर

सुशांत मृत्यू प्रकरण: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने रिया चक्रवर्तीला दिला पाठिंबा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीवर जोरदार टीका होत आहे. या टीकाकारांना फटकारत अभिनेत्री हिना खानने रियाला पाठिंबा दिला होता. रिया सोडून जगात अनेक विषय आहेत त्यांच्यावर देखील व्यक्त व्हा, असा सल्ला तिने टीकाकारांना दिला. यामुळे तिला देखील सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. मात्र ट्रोलर्सला हिनाने प्रत्युत्तर दिलं आहे. मी नेहमी मी नेहमी सत्याच्याच बाजूने उभी राहते, असं ती म्हणाली आहे.

कंगना रणौतच्या लोकप्रियतेला उतरती कळा?; दिवसाला ५० हजार फॉलोअर्स करतायत अनफॉलो

“मी नेहमी सत्याच्याच बाजूने उभी राहाते. चाहत्यांना मी विनंती करेन तुम्ही देखील माझ्यासोबत उभे राहा. आपण जर एकमेकांना पाठिंबा दिला तर आपल्याला कुठल्याही मीडिया ट्रायल घाबरण्याची गरज नाही. कोणाचीही भीती न बाळगता मी स्वत:चं मत मांडते. कारण माझी ताकत सत्यामध्ये आहे. जय हिंद.” अशा आशयाचं ट्विट करुन हिना खानने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

एकता कपूरची नागिन ठरली ‘खतरों के खिलाडी’ची विजेता; पटकावली ‘मेड ईन इंडिया’ ट्रॉफी

यापूर्वी काय म्हणाली होती हिना खान?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. परिणामी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे रियावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ही टीका अभिनेत्री हिना खानला आवडलेली नाही. तिने रियाला पाठिंबा देत टीकाकारांवर संताप व्यक्त केला. “पुराव्यांअभावी अशी टीका करु नका त्यामुळे तिचं करिअर संपून जाईल”, असं मत हिनाने व्यक्त केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:35 pm

Web Title: hina khan rhea chakraborty sushant singh rajput death case mppg 94
Next Stories
1 हिना खानला करायचं होतं ‘या’ क्षेत्रात करिअर; पण…
2 “घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी देव जबाबदार नाही”; शत्रूघ्न सिन्हा यांचा केंद्राला टोला
3 या दिवशी प्रदर्शित होणार अक्षयचा ‘Into The Wild’मधील एपिसोड
Just Now!
X