22 October 2020

News Flash

‘होम मिनिस्टर घरच्याघरी’ वारी विशेष भाग; ‘या’ वहिनींना मिळणार संधी

भावोजी 'होम मिनिस्टर घरच्या घरी'द्वारे तमाम वहिनींची ऑनलाइन भेट घेत आहेत.

आदेश बांदेकर

कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं?  दोघांपैकी कोण जास्त चिडतं?असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होम मिनिस्टरचा कार्यक्रमाचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. लॉकडाउनच्या काळात भावोजी ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’द्वारे तमाम वहिनींची ऑनलाइन भेट घेत आहेत. महाराष्ट्रातील सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होम मिनिस्टरमध्ये लवकरच विठ्ठलाच्या नगरीत राहणाऱ्या ‘सौं.’ना संधी मिळणार आहे.

आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर घरच्याघरी कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भावोजींनी थेट पंढरपूरची ऑनलाइन वारी केली. २२ जून ते १ जुलै दरम्यान प्रदर्शित होणाऱ्या वारी स्पेशल एपिसोड्समध्ये भावोजी आळंदी, देहू, फलटण, पंढरपूर या ठिकाणी स्थायिक असलेल्या वहिनींची भेट घेणार आहेत.

सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ६.३० वाजता झी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 6:46 pm

Web Title: home minister vari special episodes with adesh bandekar ssv 92
Next Stories
1 ‘टोटल हुबलाक’मध्ये मोनालिसाचा गावरान अंदाज!
2 सैफचं घराणेशाहीवर मोठं वक्तव्य म्हणाला, “होय हे खरं आहे की भारतात…”
3 ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मधल्या एका प्रसंगाने माझं आयु्ष्यच बदलून गेलं-हुमा कुरेशी
Just Now!
X