News Flash

जगभरात नावाजलेली वेब सीरिज ‘हॉस्टेजेस’ आता छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला

विशेष म्हणजे मराठी प्रेक्षकांना मराठीतून या वेब सीरिजचा आनंद घरबसल्या लुटता येणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे नवनवे पर्याय घेऊन येण्याचं काम विविध वाहिन्या करत आहेत. आता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांना वेब सीरिज पाहायला मिळणार आहे. १३ एप्रिलपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर ‘हॉस्टेजेस’ ही वेब सीरिज प्रसारित होणार आहे. जगभरात नावाजलेल्या या वेब सीरिजची ‘हॉस्टेजेस’ ही भारतीय आवृत्ती आहे. ‘हॉटस्टार स्पेशल्स’ने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे मराठी प्रेक्षकांना मराठीतून या वेब सीरिजचा आनंद घरबसल्या लुटता येणार आहे. थ्रीलर असणारी ही वेब सीरिज प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल यात शंका नाही.

‘हॉस्टेजेस’ ही संपूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे. ही गोष्ट आहे अश्या डॉक्टरची जिच्यावर मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात येते. मात्र शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीच त्या डॉक्टरच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. कुटुंबाला वाचवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांचा जीव वाचता कामा नये अशी अट त्या डॉक्टरसमोर ठेवण्यात येते. या द्विधा मनस्थितीत डॉक्टर आपलं कर्तव्य पूर्ण करणार की कुटुंबाचा जीव वाचवणार याची उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे ‘हॉस्टेजेस’ ही वेबसीरिज.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 1:49 pm

Web Title: hostages web series to telecast on star pravah during lockdown ssv 92
Next Stories
1 तेव्हा मी अंध होईन की काय असं वाटलं होतं; अमिताभ यांनी सांगितला किस्सा
2 Video : लॉकडाउनध्ये राखी उपाशी; मासे पाहून तोंडाला सुटलं पाणी
3 आर्थिक मदतीचा गाजावाजा करायचा नव्हता; तापसीचं ट्रोलर्सना उत्तर
Just Now!
X