एकाच चेहऱ्याच्या आणि सेम टू सेम दिसणाऱ्या सात व्यक्ती जगात असतात असे म्हटले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती एका लोकप्रिय कलाकारासारखी दिसते तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटते. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसारखी दिसणारी व्यक्ती सध्या चर्चेत आहे. ती व्यक्ती स्वत: शाहरुख खानची मोठी चाहती असून त्याने शाहरुखच्या अनेक चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. पण तो चित्रपटात काम करण्यासाठी किती पैसे घेत असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

या व्यक्तीचे नाव प्रशांत वालदे आहे. त्याने शाहरुखच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने आजवर शाहरुखच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘ओम शांति ओम’, ‘डॉन २’, ‘फॅन’, ‘रब ने बना दी जोड़ी’, ‘रईज’, ‘डियर जिंदगी’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण प्रशांतला शाहरुखच्या जागी चित्रपटात एखाद सीन करण्यासाठी किती पैसे मिळत असतील असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prashant Walde (@prashantwalde) on

प्रशांतने काही दिवसांपूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याला शाहरुखचा बॉडी डबल म्हणून काम करण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने ‘मी शाहरुखच्या दिग्दर्शकांसाठी नेहमी उपलब्ध असतो. शाहरुखच्या अनुपस्थितीमध्ये ते मला डमी म्हणून वापरतात’ असे म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prashant Walde (@prashantwalde) on

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशांतने आधीच्या एका मुलाखतीमध्ये त्याला चित्रपटात काम करण्यासाठी मिळत असलेल्या मानधनाचा खुलासा केला होता. त्याला शाहरुखचा बॉडी डबल म्हणून काम करण्यासाठी दर दिवसाला तीस हजार रुपये मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ओम शांती ओम या चित्रपटात पहिल्यांदा त्याने काम केले होते. ‘त्यावेळी मला विश्वासच बसत नव्हता की माझ्या गॉडफादरला भेटतो आहे. पण शाहरुखला देखील मला भेटून आनंद झाला होता’ असे तो म्हणाला.