किस्सेबहाद्दर अभिनेते संजय मोने यांनी लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत विनोदी लिखाण कसं करायचं? याबाबत तरुणांना मार्गदर्शन केलं. संजय मोने एक उत्तम विनोदी लेखक म्हणून ओळखले जातात. ‘संशय कल्लोळ’, ‘साडे माडे तीन’, ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’, ‘पक पक पकाक’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपट व नाटकांचे संवाद त्यांनी लिहिले आहेत. शिवाय विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी अनेक विनोदी लेखही लिहिले आहे. परंतु हे विनोदी लिखाण करताना काय काळजी घ्यायला हवी? कसं निरिक्षण करायला हवं? विषयाची मांडणी कशी करावी? याबाबत त्यांनी चाहत्यांना मार्गदर्शन केलं. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील विनोदी लेखकाचे गुण आत्मसाद करु शकता…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 4:50 pm