मराठी चित्रपट किंवा मालिकां यांचं बजेट कमी असतं असे अनेकदा साऱ्यांनीच ऐकलं आहे.मात्र, बऱ्याच चित्रपट, मालिकांमध्ये कमी बजेटमध्येदेखील उत्तम सेट, चित्रीकरण पाहायला मिळालं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘जय मल्हार’ मालिका. तर कमी बजेटमध्ये या मालिकांचं चित्रीकरण कसं होतं हे महेश कोठारे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मोठा पडदा गाजवल्यानंतर महेश कोठारे यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. आजवर त्यांच्या ‘जय मल्हार’, ‘श्री गणेशा’, ‘दख्खनचा राजा जोतिबा’, अशा अनेक पौराणिक मालिका प्रक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक मालिकेत त्यांनी भव्य सेट उभारले असून कमी बजेटमध्ये हे सारं बसवणं म्हणजे तारेवरची कसरत असते असंही त्यांनी सांगितलं.