News Flash

‘ब्रीद’च्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चनसोबत दिसणार हृषिकेश जोशी

‘ब्रीद’चा दुसरा सिझन अॅमेझॉन प्राईमवर १० जुलैपासून

आर माधवनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ब्रीद’(Breathe) या वेब सीरीजचा पहिला सिझन गाजल्यानंतर आता दुसरा सिझन येत आहे. त्यामध्ये अभिषेक बच्चनबरोबर हृषिकेश जोशी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील हृषिकेशच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेश इन्स्पेक्टर प्रकाश या भूमिकेत आहे.

अभिषेक बच्चन, हृषिकेश जोशी यांच्यासोबतच दाक्षिणात्य अभिनेत्री नित्या मेननचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. १० जुलै रोजी ही सीरिज अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या सिझनचेही दिग्दर्शन मयांक शर्मा यांनी केलं आहे. भवानी अय्यर, विक्रम टुली आणि अर्षद सय्यद यांनी या सीरिजचे लेखन केले आहे.

“मला जेव्हा पहिल्या सिझनसाठी बोलावले गेले, तेव्हा माझ्यासाठी वेब सीरीज हे माध्यम नवीन होते. फारशी माहितीही नव्हती. पण हेच आता भविष्य असणार आहे, हे नक्की ठाऊक होते. त्यामुळे हे करायचे असे मी ठरवले. ऑडिशनमधील माझं अभिनय निर्माते, दिग्दर्शक यांना खूपच आवडलं आणि या वेब सीरीजसाठी माझ्याकडून लगेच होकार पण घेण्यात आला,” असं हृषिकेश जोशी म्हणाले.

“या सिझनच्या चित्रिकरणादरम्यान माझी आणि अभिषेक बच्चनची खूप चांगली मैत्री झाली. आम्ही एकत्रच जेवायचो, सेटवर खूप क्रिकेट खेळायचो. खूप गप्पा मारायचो. अभिषेकला आणि मला गोड पदार्थ खूप आवडतात. त्याने एकदा खास माझ्यासाठी जयाजींनी बनवलेला गाजरचा हलवा आणला होता. अभिषेकला मराठी कलाकारांबद्दल आणि मराठी रंगभूमीबद्दल प्रचंड आदर आहे,” असं हृषिकेशने सांगितलं.

पहिल्या सिझनला संपूर्ण भारतातून तसेच अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, आखाती देश येथून प्रचंड प्रतिसाद मिळाला. परदेशातही हृषिकेशने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं. आर माधवनने स्वतः ट्वीट करून हृषिकेशच्या कामाची वाहवा केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 6:25 pm

Web Title: hrishikesh joshi with abhishek bachchan in breathe season 2 ssv 92
Next Stories
1 अक्षय विसरला होता ट्विंकलचा वाढदिवस, अचानक द्यावे लागले होते ‘हे’ गिफ्ट
2 Video : वादक ते संगीतकार ;अशोक पत्की यांचा संगीतमय प्रवास
3 ..म्हणून सुशांतच्या शेवटच्या चित्रपटातील ‘हा’ डायलॉग होतोय ट्रेण्ड
Just Now!
X