01 October 2020

News Flash

“मी तर भगवान दादांचा मुलगा”; श्रीदेवी आणि हृतिक यांचा ३४ वर्ष जुना व्हिडीओ व्हायरल…

...जेव्हा श्रीदेवी यांनी लहानग्या हृतिकला विचारलं होतं त्याचं नाव

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो. मात्र यावेळी हृतिक दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यामुळे चर्चेत आहे. श्रीदेवी यांनी ३४ वर्षांपूर्वी हृतिकला त्याचं नाव विचारलं होतं. या प्रश्नावर भगवान दादाचा मुलगा असल्याचं त्याने सांगितलं होतं. हा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – WWE मध्ये नोकर कपात; या सुपरस्टार्सला दाखवला बाहेरचा रस्ता

 

View this post on Instagram

 

Throwback to when #HrithikRoshan shared screen space with late #Sridevi in #BhagwaanDada.

A post shared by Filmfare (@filmfare) on

Justice For Sushant: अमेरिकेतील चाहत्यांचा सुशांतच्या कुटुंबीयांना पाठिंबा

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही व्हिडीओ क्लिप १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘भगवान दादा’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात श्रीदेवी आणि रजनिकांत यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. तसेच हृतिकने बालकलाकारची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील एका सीनमध्ये श्रीदेवी हृतिकला त्याचं नाव विचारतात. या प्रश्नावर हृतिक म्हणतो, “माझं नाव गोविंदा आहे. मी भगवान दादाचा मुलगा आहे. शांती नगरच्या फॅक्ट्रीमध्ये मी मॅनेजर म्हणून काम करतो.” या सीनमधील हृतिकचा अभिनय पाहून त्यावेळी श्रीदेवी देखील आश्चर्यचकित झाल्या होत्या. हृतिक आणि श्रीदेवी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हृतिकच्या अभिनयाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 11:21 am

Web Title: hrithik roshan and sridevi throwback video viral mppg 94
Next Stories
1 माजी मिस इंडियाला करोनाची लागण; पुण्याहून मुंबईत आल्यावर दिसून आली लक्षणं
2 बिग बॉस १४चा प्रोमो प्रदर्शित, शोला मिळावे नवे टायटल
3 ‘सुशांतच्या रुममधील फॅनही वाकलेला नव्हता, कडीही तुटलेली होती’; फॉरेन्सिक तज्ज्ञाचा खुलासा
Just Now!
X