News Flash

पहिल्यांदाच हृतिक आणि टायगरचा एकत्र जलवा, ‘वॉर’मधील पहिले गाणे प्रदर्शित

या गाण्यासाठी ५०० बेस्ट बॅकग्राऊंड डान्सरची निवड करण्यात आली होती

बॉलिवूडमधील डान्स म्हटलं की अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचे चित्र अनेकांन समोर उभे राहते. हृतिक आणि टायगरने त्यांच्या नृत्यशैलीच्या आधारावर बॉलिवूडवर त्याचबरोबर चाहत्यांच्या मनावरदेखील एक वेगळीच छाप उमटवली आहे. या जोडीचे एकत्र नृत्य पाहण्यासाठी चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून आतुर आहेत. हे दोन्ही कलाकार ‘यशराज फिल्म्स’च्या आगामी ‘वॉर’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वीच या दोन्ही कलाकारांना एकत्र थिरकताना पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली आहे.

नुकताच ‘वॉर’ चित्रपटातील ‘जय जय शिव शंकर’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हृतिकने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हे गाणे शेअर केले आहे. गाण्यामधील हृतिक आणि टायगरचे एकत्र नृत्य पाहण्यासारखे आहे. दरम्यान हृतिक आणि टायगर रंगपंचमी खेळताना दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार या गाण्यासाठी ५०० बेस्ट बॅकग्राऊंड डान्सरची निवड करण्यात आली आहे. हृतिक आणि टायगरने या गाण्यासाठी तीन आठवडे मेहनत घेतली असल्याचेही म्हटले जात आहे. सध्या गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

काही दिवसांपूर्वी टायगर आणि हृतिक अनोख्या आणि मजेशीर पद्धतीने ‘वॉर’चे प्रमोशन करताना दिसले होते. या दोघांनी एकमेकांचे पोस्टर असलेले टी-शर्ट घातले असून त्यावर या दोघांविषयी मजेशीर अंदाजात टीका करण्यात आली होती. यामध्ये टायगरने घातलेल्या टी-शर्टची सर्वाधिक चर्चा रंगली होती. टायगरने घातलेल्या टी-शर्टवर हृतिकचा ‘क्रिश’ चित्रपटातील फोटो वापरला असून या फोटोला ‘आपली भीती मुखवट्यामागे लपवत आहेस का?’ असे कॅप्शन दिले होते.

सिद्धार्थ आनंदने ‘वॉर’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्राने निर्मिती केली आहे. २ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अॅक्शनसीनचा भरणा करण्यात आला आहे. एखाद्या हॉलिवूड चित्रपटाला टक्कर देणारे अॅक्शन सीन्स यामध्ये पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 12:11 pm

Web Title: hrithik roshan and tiger shroff war song jay jay shiv shankar is release avb 95
Next Stories
1 ‘केबीसी ११’मध्ये या स्पर्धकाला आणण्यासाठी आयोजकांची उडाली तारांबळ
2 सैफ आधी ‘या’ खानवर फिदा होती करिना
3 Emmy Awards 2019 : सेक्रेड गेम्स आणि लस्ट स्टोरीजला सर्वोत्कृष्ट मालिकेचे नामांकन
Just Now!
X