News Flash

बायोपिकमध्ये हृतिक भूमिका साकारणार म्हणताच सौरव गांगुलीने घातली ‘ही’ अट

त्याने एका शोमध्ये हे मजेशीर अंदाजात म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपियाचा ‘नो फिल्टर नेहा’ हा शो सतत चर्चेत असतो. या शोमध्ये अनेक कलाकार सहभागी होतात. ते त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी किंवा करिअरशी संबंधीत अनेक गोष्टी या शोमध्ये नेहासोबत शेअर करताना दिसतात. नुकताच या शोमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने हजेरी लावली आहे. दरम्यान त्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आला तर त्यामध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला अट घातली आहे.

नुकताच नेहा धूपियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘नो फिल्टर नेहा’ शोमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आणि सौरव गांगुली हे गप्पा मारताना दिसत आहेत. दरम्यान नेहा सौरव यांना त्यांच्या बायोपिकची तयारी सुरु असल्याचे म्हटले. त्यावर सौरव यांनी या चित्रपटात कोणता अभिनेता भूमिका साकारु शकते असे नेहाला विचारतात. त्यावर नेहाने अभिनेता हृतिक रोशन साकारु शकतो असे म्हटले.

सौरव यांनी त्यावर एक अट घालत ‘हृतिकला माझ्यासारखी बॉडी करावी लागेल. त्याची बॉडी चांगली असल्यामुळे लोकं त्याचे कौतुक करतात. पण चित्रपटात त्याला भूमिका साकारण्यासाठी माझ्यासारखी बॉडी करावी लागेल’ असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 7:56 pm

Web Title: hrithik roshan as sourav ganguly in biopic but he put one condition avb 95
Next Stories
1 अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांची करोनावर मात
2 उत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी, योगी आदित्यनाथांची घोषणा
3 हर्ष गोयंकांनी केले जगातील सुंदर महिलांशी संबंधित ट्विट, अभिषेक बच्चनने दिले उत्तर
Just Now!
X