News Flash

घटस्फोटानंतर हृतिकसोबत एकत्र राहण्यावर सुझान खान म्हणते..

तिने सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशन त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. करोना व्हायरसमुळे सध्या देशात उद्भवलेली परिस्थिती पाहता सुझान मुलांची काळजी घेण्यासाठी पुन्हा हृतिकच्या घरी राहण्यास आली. त्यानंतर हृतिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे सुझानचे आभार मानले होते. पण सुझानला हृतिकच्या घरी आल्यावर कसे वाटत आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक होते. आता खुद्द सुझानने एका मुलाखतीमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुझानने नुकताच एका मासिकाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने घेतलेल्या निर्णयाच्या सकारात्मक बाजू मांडल्या आहेत. सोशल मीडियावर या मुलाखतीचा फोटो पोस्ट करत सुझानने ‘तुमच्या घरातील चार भींतीमध्ये केलेले काम हे तुमच्या सर्वोत्तम कामापैकी एक असते’ असे कॅप्शन दिले आहे.

‘COVID-19ला महामारी म्हणून घोषीत करण्यात आले आणि या व्हायरसमुळे लवकरच देशात लॉकडाउन घोषीत होणार आहे अशा चर्चा आम्ही ऐकल्या होत्या. त्यावेळी मी आणि हृतिकने आपल्या मुलांसोबत एकत्र रहायला हवे असे म्हटले. त्यानंतर आम्ही एकाच घरात राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही आनंदाने आमच्या लॉकडाउनची सुरुवात केली’ असे सुझान म्हणाली.

सुझानच्या या निर्णयानंतर नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच तिने मुलाखतीमध्ये चाहत्यांसाठी एक संदेशही दिला आहे. ‘हा आपल्या सर्वांसाठी वेकअप कॉल आहे. आपण ज्या व्यक्तींवर प्रेम करतो, ज्यांच्यासोबत काम करतो त्यांच्यासोबत बॉन्डिंग करण्याची हिच योग्य वेळ आहे’ असे तिने म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:14 pm

Web Title: hrithik roshan ex wife sussanne khan revealed how she is staying with him during coronavirus lockdown avb 95
Next Stories
1 ग्रॅजुएशननंतर अमिताभ यांच्या नातीने सुरु केला स्वत:चा हा बिझनेस
2 झी टॉकीजमुळे मे महिना होणार खास; प्रेक्षकांना मिळणार चित्रपटांची मेजवानी
3 करोनासाठी चीनला दोषी ठरवणं पडलं महागात; गायकाने मागितली माफी
Just Now!
X