X
X

हृतिकच्या लहानपणीचा व्हिडीओ व्हायरल; लग्नात केला अफलातून डान्स

READ IN APP

हृतिकच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

डान्स म्हटलं की बॉलिवूडमध्ये अभिनेता हृतिक रोशनचं नाव सर्वांत आधी घेतलं जातं. डान्स आणि हृतिक रोशन हे समीकरण जेव्हा जुळून येतं, तेव्हा प्रेक्षकही भारावून जातात. अनोखे स्टेप्स असो किंवा मग डान्स करण्याची अनोखी शैली, हृतिकने नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. डान्सची ही आवड त्याला लहानपणापासूनच होती. याची प्रचिती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओवरून येते. हृतिकच्या लहानपणीचा हा व्हिडीओ असून खुद्द त्याच्या आईने इन्स्टाग्रामवर तो पोस्ट केला आहे.

हृतिकची आई पिंकी रोशन यांनी इन्स्टाग्रामवर एका लग्नातील व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अमिताभ बच्चन यांच्या ‘आप का क्या होगा’ या गाण्यावर लग्नातील पाहुणे मंडळी नाचताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये आवर्जून आपलं लक्ष वेधलं जातं ते म्हणजे निळा शर्ट परिधान केलेल्या एका लहान मुलाकडे. हा मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक आहे. हृतिक आपल्याच धुंदीत अफलातून डान्स करतोय. गाण्याचा पुरेपूर आनंद लुटत डान्स करणाऱ्या या लहानग्या हृतिकने सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

Photos: ‘शाळा’ चित्रपटातील ‘मुकुंद जोशी’ आता असा दिसतो

सोशल मीडियावर या व्हिडीओला भरभरून लाईक्स व कमेंट्स मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी हृतिकचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये त्याच्यासोबत टायगर श्रॉफने मुख्य भूमिका साकारली होती. अॅक्शन व डान्सचा तडका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता.

21
X