अभिनेता हृतिक रोशन हा बॉलिवूड मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. हृतिकचे लाखो चाहते आहेत. हृतिक सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. हृतिक नेहमीच त्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच हृतिकने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हृतिकचा व्हायरल झालेला हा फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो ट्रेकिंगचा असल्याचे दिसत आहे. या फोटोत हृतिक त्याची दोन्ही मुलं आणि सुझानचा भाऊ झायेद खान देखील आहेत. हृतिकने हिरव्या रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची शॉर्ट परिधान केले आहेत. हृतिकने कुटुंबीयांसोबतचा फोटो शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत हृतिकने झायेद खानला टॅग केले आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा- सरप्राईज! …म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात
‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या चित्रिकरणाला हृतिक लवकरच सुरूवात करणार याहे. यासोबत हृतिक दक्षिणात्य चित्रपट विक्रम वेधा या चित्रपटाच्या हिंदी रिमेक मध्ये दिसणार आहे.