News Flash

‘क्रिश ४’ कधी प्रदर्शित होणार, हृतिक रोशन म्हणतो…

हृतिकचे आजारपण आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या इतरही अडचणींमुळे हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला होता

गेल्या वर्षी अभिनेता हृतिक रोशनच्या वाढदिवसाच्या दिवशी भारतीय सुपरहिरो क्रिश सिरिजमधल्या चौथ्या चित्रपटाची घोषणा वडिल रोकेश रोशन यांनी केली होती. दरम्यान हा चित्रपट २०२०च्या क्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. मात्र काही कारणामुळे या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा मुहूर्त सापडत नव्हता. अखेर ‘सुपर ३०’ चित्रपटाच्या यशानंतर आता हृतिक रोशनने ‘क्रिश ४’ चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याचा खुलासा केला आहे.

झूम टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हृतिक रोशनने ‘क्रिश ४’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान चित्रपटात कोणते कलाकार झळकणार आणि चित्रपट २०२०मध्ये केव्हा प्रदर्शित होणार याबाबत खुलासा केलेला नाही. ‘क्रिश ४ या चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आहे. जर मी क्रिश व्यतिरिक्त कोणता चित्रपट हाती घेतला तर या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात येईल’ असे हृतिक म्हणाला.

२००३ साली आलेल्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटाचा ‘क्रिश ४’ चौथा भाग असणार आहे. हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला ‘कोई मिल गया’ हा चित्रपट खूपच गाजला. त्यानंतर हृतिक रोशन पुढच्या भागांत सुपरहिरोच्या भूमिकेत दिसला. ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. अनुक्रमे २००६ आणि २०१३ मध्ये हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या तिन्ही चित्रपटांच्या यशानंतर ‘क्रिश ४’ येणार असल्याचे हृतिकने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 3:03 pm

Web Title: hrithik roshan talks about when krrish 4 is going to release avb 95
Next Stories
1 Sacred Games 2 : “पार्लमेंट अपने बाप का है” का म्हणतोय गणेश गायतोंडे?
2 रेणुका शहाणेंच्या सोशल मीडियावर व्यक्त होण्यावर पती आशुतोष राणा म्हणतात..
3 करिना कपूरला साकारायची श्रीदेवीची ही भूमिका
Just Now!
X