14 July 2020

News Flash

Photo : हृतिक-टायगरमध्ये सुरु झालं टी-शर्ट ‘WAR’

नक्की काय आहे टी-शर्ट वॉर?

जबरदस्त अॅक्शन, शरीरयष्टी, आणि अफलातून डान्ससाठी ओळखले जाणारे दोन अभिनेते म्हणजे हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ. लवकरच हे दोन्ही कलाकार ‘यशराज फिल्म्स’च्या आगामी ‘वॉर’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वीच या दोन्ही कलाकारांमध्ये एक नवा ‘वॉर’ रंगल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या हे दोन्ही कलाकार एकमेकांवर मजेशीर अंदाजात टीका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ही टीका म्हणजे चित्रपटाचं प्रमोशन करण्याची नवीन स्टाईल असल्याचं सांगण्यात येत आहे.

आतापर्यंत बॉलिवूडमधील प्रत्येक चित्रपटाचं प्रमोशन हे ठरलेल्या पठडीतच झालेलं आहे. मात्र ‘वॉर’च्या टीमने हटके पद्धतीने प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे दोन्ही कलाकार आपल्या चित्रपटाचं जोरदार प्रदर्शन करत आहेत. हृतिक आणि टायगर या दोघांनी एकमेकांचे पोस्टर असलेले टी-शर्ट घातले असून त्यावर या दोघांविषयी मजेशीर अंदाजात टीका करण्यात आली आहे. यामध्ये सध्या टायगरने घातलेल्या टी-शर्टची सर्वाधिक चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.

टायगरने घातलेल्या टी-शर्टवर हृतिकचा ‘क्रिश’ चित्रपटातील फोटो लावला असून या फोटोला आपली भीती मुखवट्यामागे लपवत आहेस का? असं कॅप्शन दिलं आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शिन केलं आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 4:27 pm

Web Title: hrithik vs tiger tiger shroff stars a t shirt meme war on hrithik roshan ssj 93
Next Stories
1 सुश्मिताशी ब्रेकअपवर दिग्दर्शकाने इतक्या वर्षांनी केला खुलासा
2 फत्तेशिकस्तमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार बहिर्जी नाईक यांची भूमिका
3 ‘राजी’, ‘सत्यमेव जयते’नंतर ‘मलंग’ मध्ये दिसणार अमृता खानविलकर
Just Now!
X