News Flash

‘हृदयात समथिंग समथिंग’चा ट्रेलर प्रदर्शित

'हृदयात समथिंग समथिंग'मध्ये अशोक सराफ पहिल्यांदाच लव्ह गुरुच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

'हृदयात समथिंग समथिंग'चा ट्रेलर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. या चित्रपटाच्या टीझरनंतर आता याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘हृदयात समथिंग समथिंग’मध्ये अशोक सराफ पहिल्यांदाच लव्ह गुरुच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यात भर पडली आहे ती चित्रपटाच्या ट्रेलरची. मुंबईमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.

‘चित्रपटाची निर्मिती करावी ही माझी कित्येक वर्षापासूनची इच्छा होती. अखेर ही इच्छा या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झाली. या चित्रपटाच्या माध्यमातून मी पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. एक निखळ मनोरंजन करणाऱ्या कौंटुंबिक विनोदी चित्रपट तयार करावा अशी माझी इच्छा होती. ही इच्छा मी माझ्या मित्रांकडे व्यक्त केली. त्यानंतर मी आणि शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, अतुल गुगळे आम्ही साऱ्यांनी मिळून हृदयात समथिंग समथिंग या चित्रपटाची निर्मिती केली. आता ह्या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना मिळणा-या प्रतिसादावरून आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळाल्यासारखे वाटते आहे’, असं निर्माता विनोदकुमार जैन म्हणाले.

दरम्यान, हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक या कलाकारांची मांदियाळी पाहता येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 6:36 pm

Web Title: hrudayat something something trailer launch
Next Stories
1 …तर चेतन भगतच्या ‘The Girl in Room No 105’ वरही चित्रपट येईल
2 मी कधीच अपयशी नव्हतो – गोविंदा
3 अबब! ‘2.0’ च्या फक्त VFXवर तब्बल ५४४ कोटींचा खर्च
Just Now!
X