07 August 2020

News Flash

ऋता दुर्गुळे करणार ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन

ऋता पहिल्यांदाच सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत

ऋता दुर्गुळे

ऋता दुर्गुळे हा मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहरा पहिल्यांदाच सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आजपर्यंत ऋताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या दुर्वा आणि वैदेही या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तिचा स्वतःचा मोठा चाहता वर्ग आहे.

सोनी मराठीच्या ‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमात ती पहिल्यांदाच सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडताना तिला सर्व स्पर्धक आणि परीक्षक यांच्याशी संवाद साधायची संधी मिळणार आहे. मालिका, नाटक आणि सिनेमा यांतून अभिनय करताना दिसणारी ऋता सूत्रसंचालनाचा नवा प्रयत्न करणार आहे. तिच्यासाठी देखील हा अनुभव नवीन असणार आहे आणि या नव्या अनुभवासाठी तीदेखील उत्सुक आहे.

‘गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे असे’ म्हणत ऑगस्टपासून ‘सिंगिंग स्टार’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे, पण या कार्यक्रमात कोण-कोण असणार आहे हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 6:13 pm

Web Title: hruta durgule to host singing star program ssv 92
Next Stories
1 ‘विद्या बालनसोबत काम करणं म्हणजे…’; सान्याने शेअर केला ‘शकुंतला देवी’मधील अनुभव
2 पोट भरण्यासाठी रस्त्यावर काठी फिरवणाऱ्या आजीबाईंच्या मदतीसाठी पुढे सरसावला सोनू सूद
3 अहंकारामुळे होतो ‘या’ गोष्टींचा नाश; अमिताभ बच्चन यांचं मार्मिक ट्विट
Just Now!
X