News Flash

India’s Best Dramebaaz : प्रसिद्ध रिअॅलिटी शोमध्ये सोनालीची जागा घेणार ही अभिनेत्री

३० जून २०१८ ला या रिअॅलिटी शोचा पहिला भागही प्रदर्शित झाला. मात्र सोनालीनं हा शो वैयक्तिक कारण देत अर्धवट सोडला होता.

अकाऊंटवर 'इंडिया बेस्ट ड्रामेबाझ'या रिअॅलिटी शोची सोनाली परीक्षक होती.

गेल्याच आठवड्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनं आपल्या विविध सोशल मीडिया अकाऊंटवर ‘इंडिया बेस्ट ड्रामेबाझ’चं जोरदार प्रमोशन केलं होतं. या रिअॅलिटी शोमध्ये सोनाली परीक्षक होती. ३० जून २०१८ ला या रिअॅलिटी शोचा पहिला भागही प्रदर्शित झाला. मात्र पुढचं चित्रिकरण करण्यास सोनालीनं नकार दिला. हा शो आपण वैयक्तिक कारणासाठी सोडत असल्याचं तिनं सांगितलं होतं. मात्र यामागचं कारण अनेकांना माहिती नव्हतं. आता या कारणावरून पडदा उठला आहे. सोनालीला कॅन्सरचं निदान झालं आहे. पुढील उपचारासाठी ती न्यूयॉर्कला गेली आहे. सोनालीनं स्वत: ट्विट करत कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली. या बातमीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.

सोनालीनं अनेक रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पडली आहे. त्यातून लहान मुलांच्या रिअॅलिटी शोचं परीक्षण करणं सोनालीला आवडायचं. ‘इंडिया बेस्ट ड्रामेबाझ’च्या नव्या सिझनसाठी सोनाली खूपच उत्सुक होती. ३० जून रोजी तिनं सेटवरचा एक फोटोही ट्विट केला होता. ३० जून आणि १ जुलैला या शोचे दोन भाग प्रदर्शित करण्यात आले होते. सोनालीनं हा शो सोडल्यानंतर आता तिची जागा अभिनेत्री हुमा कुरेशी घेणार आहे. या रिअॅलिटी शोची परीक्षक म्हणून हुमा काम पाहणार आहे. हुमा पहिल्यांदाच एका रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक असणार आहे.

‘कधी कधी तुम्हाला काही गोष्टींची कुणकुण लागते आणि अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात बदल होतो. मला हाय- ग्रेड कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. सतत वेदना जाणवत असल्याने काही चाचण्या केल्या आणि त्यातून कॅन्सर झाल्याचं अनपेक्षितपणे निदान झालं. माझे कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी खूप साथ दिली आहे. त्या सर्वांचे मी आभार मानते. मी कॅन्सरची लढाई लढण्यास सज्ज आहे’ अशी भावनिक पोस्ट सोनालीनं ट्विटरवर शेअर केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 1:47 pm

Web Title: huma qureshi replaces sonali bendre as the judge in india best dramebaaz
Next Stories
1 ..म्हणूनच मल्लिकाचा चाहता तिला ठार मारणार होता
2 ‘शमशेरा’मध्ये रणबीरसोबत संजय दत्तही दिसणार?
3 सोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त; न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू
Just Now!
X