20 October 2020

News Flash

“माझं नाव वापरुन…”; अनुरागवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रीला हुमा खुरेशीने सुनावलं

अनुराग कश्यपवर आरोप करणाऱ्या पायल घोषवर हुमा खुरेशी संतापली

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. तिच्या या खळबळजनक आरोपांमुळे अनुरागवर सध्या जोरदार टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणात आता अभिनेत्री हुमा खुरेशी हिने देखील उडी घेतली आहे. तिने या प्रकरणात अनुरागला पाठिंबा दिला आहे. अनुरागने कधीही माझ्यासोबत गैरव्यवहार केलेला नाही असं म्हणत तिने पायल विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अवश्य पाहा – आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण…

पायलने अनुरागवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करताना काही बॉलिवूड अभिनेत्रींची नावं घेतली होती. यापैकी एक नाव हुमा खुरेशी हिचं देखील होतं. मात्र अनुराग प्रकरणात तिचं नाव घेतल्यामुळे हुमा संतापली आहे. “जी व्यक्ती तिच्यासोबत गैरव्यवहार झाल्याचा दावा करतेय तिने सोशल मीडिया ऐवजी पोलिसांकडे जाऊन तक्रार करावी. मला या प्रकरणावर काहीच प्रतिक्रिया देण्याची इच्छा नव्हती कारण सोशल मीडियावर सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात मला काहीच स्वारस्य नाही. परंतु या प्रकरणात आता विनाकारण माझं नावं या ओढलं जात आहे. अनुराग माझा खुप चांगला मित्र आहे. २०१२-१३मध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं. त्याने कधीही माझ्यासोबत गैरव्यवहार केलेला नाही. माझं नाव वापरुन त्याच्यावर केले जाणारे आरोप खोटे आहेत. अशा आशयाचं ट्विट करुन हुमा खुरेशीने आपली नाराजी व्यक्त केली आहे.” तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – “बॉलिवूडमध्ये ड्रग्स कोणी भरवत नाही”; कंगनाच्या आरोपांना श्वेता त्रिपाठीचं प्रत्युत्तर

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 6:27 pm

Web Title: huma s qureshi anurag kashyap payal ghosh casting couch in bollywood mppg 94
Next Stories
1 अभिनेत्री कविता कौशिक दिसणार बिग बॉस १४मध्ये?
2 ‘साफ सफाईची वेळ…’, ड्रग्ज प्रकरणी दीपिकासह इतर कलाकरांची नावे येताच रविनाने केले ट्विट
3 “जेव्हा मला अनुरागने घरी बोलावलं..”, माऊली फेम अभिनेत्रीची जुनी पोस्ट व्हायरल
Just Now!
X