पाकिस्तानात भीषण विमान अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला येणारे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान लँडिंग करताना रहिवाशी भागात कोसळले. या अपघातात ९०पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या दूर्दैवी घटनेवर अभिनेत्री हुमैमा मलिक हिने दु:ख व्यक्त केलं आहे. “देवा आता आम्ही थकलो आहोत आमच्यात आता धैर्य उरलेलं नाही.” अशी प्रतिक्रिया हुमैमाने दिली आहे.

अवश्य पाहा – इतकी भीती! कसलं जीवन जगत आहात; पाकिस्तान विमान अपघातावरून अभिनेत्याचा बॉलिवूडला सवाल

‘राजा नटवरलाल’ या बॉलिवूड चित्रपटात झळकलेल्या पाकिस्तानी अभिनेत्री हुमैमाने विमान अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे. “विमान अपघाताची बातमी पाहून मला प्रचंड वेदना होत आहेत. हे देवा अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांची रक्षा कर. देवा त्यांच्यावर दया कर.”

अवश्य पाहा – ‘हा तर करोनापेक्षा घातक चिनी विषाणू’; मुकेश खन्नांची TikTok वर टीका

“देवा आता आम्ही थकलो आहोत. आता तरी आम्हाला या त्रासातून मुक्त कर. आम्ही सर्वसाधारण माणसं आहोत आमच्यात आता धैर्य उरलेलं नाही.” अशा आशयाचे दोन ट्विट करुन हुमैमाने या दुर्दैवी घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. हुमैमाचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मॉडेल कॉलनी जवळच्या जिना गार्डन भागात हे विमान कोसळले. टीव्हीवरील दृश्यांमध्ये रहिवाशी इमारतींचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. तसेच घटनास्थळावर आग लागली असून धुराचे लोळ उठताना दिसत आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार या विमानात ८५ प्रवासी, १२ क्रू मेंबर्स असे एकूण ९७ जण होते.