News Flash

‘घर तोडणारी…’, त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सिमीला मागावी लागली माफी

मेगन मार्केलला दृष्ट असे म्हणताच मागितली माफी..

प्रिन्स हॅरी मार्केल आणि त्याची पत्नी मेगन मार्केलने नुकतीच विन्फ्रेला (Oprah Winfrey) दिलेली मुलाखत चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीमध्ये मेगन मार्केलने राजघराण्याशी संबंधीत अनेक धक्कादायक खुलासे केले. दरम्यान अभिनेत्री सिमी गरेवालने मेगन मार्केलला घर तोडणारी, दृष्ट असे म्हणत ट्वीट केले. तिला या ट्वीटमुळे ट्रोल देखील करण्यात आले. पण आता सिमीने तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माफी देखील मागितली आहे.

सिमीने केलेल्या ट्वीटमध्ये, माझा विश्वास बसत नाही हे सर्व मेगन मार्केल बोलत आहे. मला तिच्या एका शब्दावरही विश्वास नाही असे म्हटले असून मेगनला तिने ‘दृष्ट’ असे संबोधले होते. तिच्या या ट्वीटर उत्तर देत एका यूजरने सिमीला सुनावले होते.

सिमीला या ट्वीटमुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. ट्वीट केल्यानंतर काही वेळातच तिने ‘दृष्ट’ हा शब्द जरा जास्त होत आहे. मी तो परत घेते असे म्हणत माफी मागितली आहे.

सिमीचे हे ट्वीट पाहून एका यूजरने तिला सुनावले आहे. ‘जर ती खोटं बोलत असती तर तिच्यावर टीका करण्यात आली असती. पण आमचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. तिच्यावर विश्वास का ठेवू नये हे देखील तू सांगितलेलं नाही’ या आशयाचे ट्वीट एका यूजरने केले होते.

त्यावर सिमीने डेली मेलचे एक आर्टीकल शेअर करत ‘हे आर्टिकल वाच… जी महिला घर तोडते मी अशा महिलेचा आदर करत नाही. कुटुंबात किंवा नात्यामध्ये विश्वास निर्माण व्हायला अनेक वर्ष जातात’ या आशयाचे ट्वीट केले होते.

मेगनने मुलाखतीत सांगितलं की, “आर्चीच्या जन्माआधी कुटुंबातील सदस्यांची प्रिन्स हॅरीसोबत चर्चा झाली होती, यावेळी त्यांना बाळाचा रंग काय असेल याची चिंता सतावत होती. बाळ जन्माला येईल तेव्हा रंग गोरा नसेल याची चिंता असल्याने राजघराणं त्याला प्रिन्स करण्यासाठी तसंच कोणतीही सुरक्षा पुरवण्यास इच्छुक नव्हतं. हॅरीने कुटुंबीयांनी त्याच्याशी केलेल्या चर्चेची माहिती मला दिली होती”. मेगनने यावेळी ही चर्चा करणाऱ्या कुटुंबातील सदस्याचं नाव उघड करण्यास नकार दिला. नाव उघड करणं त्यांच्यासाठी खूप नुकसान करणारं ठरेल असं मेननने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 2:29 pm

Web Title: i do not respect women who break up homes said by simmi garewal avb 95
Next Stories
1 राखी सावंत झाली आहे ‘नागिन’, सोशल मीडियावर व्यक्त केली इच्छा
2 पॉर्नस्टार असल्यामुळे बॉलिवूडने माझा तिरस्कार केला, सनीचा खुलासा
3 “तू तर परत गर्भात जा”, रिचा चड्ढा भडकली नेटकऱ्यावर
Just Now!
X