10 August 2020

News Flash

माझ्य़ा मुलीपेक्षा लहान मुलींशी रोमान्स करण्याचा स्वप्नातसुद्धा विचार नाही- नसिरुद्दीन शाह

चित्रपटातील अभिनेता ५० वर्षाचा असेल तर अभिनेत्री त्याच्या अर्ध्या वयाच्या असल्याचे पाहावयास मिळते.

नसिरुद्दीन शाह

सध्या चित्रपटांमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यामधील वयाच्या गणिताचा फारसा विचार केला जात नाही. जर चित्रपटातील अभिनेता ५० वर्षाचा असेल तर अभिनेत्री त्याच्या अर्ध्या वयाच्या असल्याचे पाहावयास मिळते. यामध्ये शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान, आमिर अशा मोठ्या कलाकारांचीही नावे आहेत. पण, याला अपवाद असलेले अभिनेता म्हणजे नसिरुद्दीन शाह हे आहेत.
ओशियननामा महोत्सवात नसिरुद्दीन हे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी कधीचं कमर्शियल हिरो बनण्याचा किंवा माझ्य़ा मुलीपेक्षा लहान असलेल्या अभिनेत्रींशी रोमान्स करण्याचा मी कधीच स्वप्नातसुद्धा विचार केला नाही. यावेळी त्यांनी आपल्या उमेदीच्या काळातील आठवणींनाही उजाळा दिला.ते म्हणाले, माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी कधी अपयशाची भीती नाही बाळगली. तुम्ही याला माझा विश्वास म्हणू शकता किंवा माझा वेडेपणा. मला जे हवे आहे तेच मी करतोय याची मला पूर्ण शाश्वती होती. त्यामुळे जर मी यशस्वी नाही झालो तर.. असा काही विचार करण्यात अर्थच नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2015 11:20 am

Web Title: i never dreamt of romancing girls younger than my daughter naseeruddin shah
टॅग Naseeruddin Shah
Next Stories
1 ‘बाहुबली’ची किमया न्यारी, दिग्दर्शक राजा मौली आणि प्रभासची जोडी फोर्ब्सच्या यादीत
2 दिलीप प्रभावळकर यांना ‘पुलं स्मृती सन्मान’
3 ‘टूकूर टूकूर..देख टकाटक’, ‘दिलवाले’ चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित
Just Now!
X