देशभरात सध्या #MeToo चं वादळ घोंघावत आहे. यामध्ये आता अभिनेता सैफ अली खान याने धक्कादायक खुलासा केला आहे. करिअरच्या सुरुवातीला २५ वर्षांपूर्वी मलाही त्रास दिला गेला होता, तो लैंगिक छळ नसला तरी त्या गोष्टीची ची़ड अजूनही माझ्या मनात आहे, असं सैफने एका मुलाखतीत सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सैफ अली खानने या मुलाखतीत आपला #MeToo अनुभव सांगितला. ‘त्या घटनेविषयी मी आता फार काही बोलू इच्छित नाही. कारण सध्याच्या घडीला मी महत्त्वाचा नाही. तर ज्या महिला न्यायाची मागणी करत आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. #MeToo मोहिमेमुळे अन्यायाला वाचा फोडली जात आहे आणि हे खूप चांगलं आहे,’ असं तो म्हणाला. त्याचबरोबर जे कलाकार महिलांसोबत गैरवर्तन करत आहेत त्यांच्यासोबत काम न करण्याची भूमिका सैफने घेतली आहे.

#MeToo : उद्या मोदींवरही आरोप होतील- शक्ती कपूर

दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या आरोपांवरही सैफने प्रतिक्रिया दिली. ”द हमशकल्स’ या चित्रपटाच्या सेटवर अशी कोणती घटना घडल्याचं मला आठवत नाही. जर असं काही घडलंच असतं तर ते मी सहन केलंच नसतं. आता या यादीत आणकी कोणाची नावं समाविष्ट होतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे,’ असं तो पुढे म्हणाला.

More Stories onमीटूMetoo
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I was harassed 25 years ago and i am still angry about it saif ali khan on me too movement
First published on: 15-10-2018 at 14:00 IST