‘क्वांटिको’ मालिकेमुळे ‘ग्लोबल स्टार’ ठरलेली प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. प्रियांका सध्या तिच्या ‘दी स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात परतली आहे. ‘ऐतराज’, ‘बर्फी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘दिल धडकने दो’ यांसारख्या चित्रपटांत आणखी एका अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर केलेल्या प्रियांकानं आता मात्र तडजोड करण्यास साफ नकार दिला आहे. यापुढे चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून माझी निवड करण्यात येत असेल तरच मी चित्रपट करणार असं प्रियांका म्हणाली.
प्रियांकाला हॉलिवूडच्या ‘काऊबॉय निनजा वायकिंग’साठी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. याच कारणासाठी तिनं ‘भारत’ सारख्या बिग बजेट सिनेमालाही रामराम ठोकला आहे. हॉलिवूड चित्रपटाविषयी आणि यात तिला देण्यात आलेल्या भूमिकाविषयी काही प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आले. यावेळी तिनं अनेक गोष्टी उघड केल्या. आशियायी देशांतून आलेल्या कलाकारांना हॉलिवूडमधील चित्रपटात नेहमीच दुय्यम स्थान दिलं जातं. त्यांच्या वाट्याला नेहमीच सहकलाकाराची भूमिका येते. पण, याक्षणी मी कोणतीही तडजोड करणार नाही. यापुढे माझ्या वाट्याला जे चित्रपट येतील त्यात मी महत्त्वाचीच भूमिका साकारेल असं ठाम मत तिनं व्यक्त केलं आहे.
यापूर्वी बॉलिवूडमध्ये प्रियांकानं अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. मात्र त्या सगळ्या भूमिका मुख्य भूमिकेइतक्याच तोडीच्या होत्या. म्हणून मी स्विकारल्या पण आता मात्र भूमिका निवडताना कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार असा ठाम निर्धार तिनं केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 10:08 am