18 January 2021

News Flash

तैमूरने मोठं झाल्यावर हिरोच व्हावं-सैफ अली खान

अभिनेता सैफने व्यक्त केली इच्छा

तैमूरने मोठं झाल्यावर हिरोच व्हावं आणि शुक्रवारी रिलिज होणाऱ्या आपल्या सिनेमाची वाट बघावी असं मत अभिनेता सैफ अली खानने व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान सैफला तैमूरबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी सैफने हे उत्तर दिलं आहे. तैमूर हा सोशल मीडियावर फेमस असलेला ‘सेलिब्रिटी किड’ आहे. खरंतर करीना कपूरला हा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला होता त्यावेळी तिने तैमूर मोठा होऊन क्रिकेटर होईल असं म्हटलं होतं. मात्र तैमूर मोठा होऊन हिरो होईल असं मत सैफने व्यक्त केलंय. त्यामुळे तैमूर मोठा होऊन काय होईल याबाबत दोघांचं एकमत नाही असंच दिसतंय.

सैफ तैमूरबाबत काय म्हणाला?
“तैमूर मोठा झाल्यावर हिरो झाला तर मला खूपच आवडेल. त्याने मोठं होऊन त्याच्या पहिल्या फ्रायडे रिलिजची वाट बघावी. तो मोठा झाल्यावर त्याला चांगल्या सिनेमात काम मिळेल अशी मी अपेक्षा करतो”

लाल सिंग चढ्ढा या सिनेमात करीना आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिर खान लाल सिंग चढ्ढा ही भूमिका साकारतोय. थ्री इडियट्समध्ये या दोघांची केमिस्ट्री पाहण्यास मिळाली होती. आता लाल सिंग चढ्ढा या सिनेमातही आमिर आणि करीना एकत्र झळकत आहेत. दरम्यान करीना सध्या पाच महिन्यांची गरोदर आहे. येत्या चार महिन्यातच तैमूरला भाऊ किंवा बहीण होईल. त्याचीही चर्चा तैमूरप्रमाणे होईलच. तैमूरचे सोशल मीडियावरचे फोटो चांगलेच व्हायरल होत असतात. आता तैमूर मोठा झाल्यावर काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच तैमूर हा स्पॅनिश भाषा शिकत असल्याचं करीनाने सांगितलं होतं. पिंक व्हिलाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 9:36 pm

Web Title: i would like him to be an actor says saif ali khan on son taimur scj 81
Next Stories
1 शेवंताचे टीव्हीवर पुनरागमन, नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित
2 चर्चेत असणाऱ्या लग्नाच्या फोटोंवर अनुप जलोटा यांचे स्पष्टीकरण, ‘फोटो खरा आहे पण…’
3 ‘पीएम मोदी’ पुन्हा चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित, निर्माता संदीप सिंहने केली घोषणा
Just Now!
X