28 January 2020

News Flash

मला विनालग्नाचं मूल नको होतं- नीना गुप्ता

विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्या रिलेशनशिपने ८० च्या दशकापासूनच अनेकांचं लक्ष वेधलं होतं. त्या दोघांनी लग्न केलं नाही.

नीना गुप्ता आणि त्यांची मुलगी मसाबा गुप्ता

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्याऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता आणि त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी चर्चेत होत्या. वेस्ट इंडिजच्या संघातील माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांना मसाबा ही मुलगी आहे. मसाबा गुप्ता प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून या मायलेकी विवियन रिचर्ड्ससोबत राहत नाहीत. प्रत्येक मुलाला आई आणि बाबा या दोघांची गरज असते. मला विनालग्नाचं मूल नको होतं, अशी भावना नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली.

नीना गुप्ता यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. सध्या फॅशन विश्वात मसाबाचं नाव फार प्रसिद्ध आहे. ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्ता म्हणाल्या, “मला विनालग्नाचं मूल नको होतं. प्रत्येक मुलाला आई आणि वडील या दोघांचीही गरज असते. मसाबाशी मी नेहमीच प्रामाणिक राहिले, त्यामुळे आमच्या नात्यावर परिणाम झाला नाही. पण तिनेही त्रास सहन केला आहे याची मला कल्पना आहे.”

कपडे आणि फॅशनच्या बाबतीत मसाबा त्यांना बरेच सल्ले देत असल्याचं नीना यांनी सांगितलं. “एखादी नवीन स्टाइल आत्मसात करताना संकोचलेपणा जाणवू नये, असं ती मला म्हणते. कपडे आणि फॅशनच्या जुनाट समजुती मोडून काढण्याकडे तिचा अधिक कल असतो”, असं त्या म्हणाल्या.

आणखी वाचा : जास्त गोरेपणामुळे मला चित्रपट मिळाला नाही; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्या रिलेशनशिपने ८० च्या दशकापासूनच अनेकांचं लक्ष वेधलं होतं. त्या दोघांनी लग्न केलं नाही. पण, तरीही मसाबासाठी त्यांनी नेहमीच काही कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावण्याला प्राधान्य दिलं. मसाबा गुप्ता सध्याच्या घडीला फॅशन जगतात बरीच लोकप्रिय असून, ‘हाऊस ऑफ मसाबा’ या नावाने ती स्वत:चा फॅशन ब्रँड चालवते.

First Published on January 15, 2020 12:13 pm

Web Title: i would not have a child outside marriage says neena gupta on having daughter masaba out of wedlock ssv 92
Next Stories
1 CAA आणि NRC संदर्भात ‘शक्तिमान’ची चौकशी? जुना व्हिडिओ व्हायरल
2 जास्त गोरेपणामुळे मला चित्रपट मिळाला नाही; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा
3 Photo : ‘माफिया क्वीन’ गंगुबाईच्या लूकमध्ये आलिया
Just Now!
X