22 October 2020

News Flash

काळीज हेलावून टाकणारी प्रेमकथा ‘इभ्रत’

प्रेम ही जगातली एक सुंदर भावना आहे

जगात प्रेमासारखी सुंदर गोष्ट नाही. आजवर अनेकांच्या प्रेमकथा अजरामर झाल्या. यामध्ये रोमियो-ज्युलिएट, लैला-मजनू यांची प्रेमकथा आजही साऱ्यांच्या लक्षात आहे. प्रेम ही जगातली एक सुंदर भावना आहे. ज्याने ही भाषा शिकली त्यालाच ती उमगते आणि एका नवीन, स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. त्यामुळे अशीच एक प्रेमकथा ‘इभ्रत’ या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे.

श्रुती वसंत दांडेकर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण रमेश क्षीरसागर यांनी केलं आहे. ‘इभ्रत’मध्ये संजय शेजवळ,शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायल मिळणार आहेत. तिकीटबारीवर तुफान गाजलेल्या रेडू आणि टकाटक या चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे यांनी ‘इभ्रत’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.

दरम्यान, ‘इभ्रत’ची कथा अण्णाभाऊ साठे यांची आहे. या चित्रपटाला सुबोध नारकर यांनी संकलित केलं असून अनिल वाथ यांनी या चित्रपटाचं कला दिग्दर्शन केलं आहे. नरेंद्र पंडीत यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. तरल आणि नितळ प्रेमाची गोष्ट सांगणारा इभ्रत २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 4:13 pm

Web Title: ibhrat marathi film based on a true love story ssj 93
Next Stories
1 मुँह में दही काहे जमा है रे?; ‘आर्टिकल १५’च्या दिग्दर्शकाचा सेलिब्रिटींना सवाल
2 सई मांजरेकर आहे सलमानचा ‘जीव’; जाणून घ्या कारण..
3 १९७६ मध्ये ‘मिस इंडिया’ खिताब पटकावणाऱ्या अभिनेत्रीला पाहून व्हाल थक्क!
Just Now!
X