बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या कठिण कळातून जात आहे. तिची ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. त्यावेळी सारा गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. दरम्यान तिला एनसीबीने समन्स बजावल्यामुळे मुंबईला यावे लागले होते. आता साराचा भाऊ इब्राहिमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
इब्राहिमने अजून त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवातही केलेली नाही तरी देखील तो प्रचंड लोकप्रिय आहे. अनेकजण त्याला सैफ अली खानची कार्बन कॉपी असल्याचे बोलताना दिसतात. इब्राहिम हा सतत सारासोबत फोटो शेअर करताना दिसतो. त्या दोघांचे बॉडिंग त्यांनी शेअर केलेल्या फोटोंमधून पाहायला मिळते. नुकताच इब्राहिमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो स्वमिंगपूलमध्ये असल्याचे दिसत आहे.
हा फोटो शेअर करत त्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इब्राहिम स्विमिंगपूलमधील फोटोसोबत विन्सटन चर्चिल यांचा कोट शेअर केला आहे. ‘जर तुम्ही कठिण काळातून जात असाल तर पुढे जात रहा’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी त्याला ट्रोल केले आहे तर काहींनी त्याच्या लूकवर फिदा झाल्याचे म्हटले आहे.