News Flash

“नामांकित अभिनेता असतानाही मला…”; वर्णद्वेषाबद्दल सांगताना ‘अ‍ॅव्हेंजर्स’मधील अभिनेता रडला

एद्रिस एल्बाने सांगितल्या वर्णद्वेषाच्या कटू आठवणी

पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा संबंध अमेरिकेतील वर्णद्वेषाशी जोडला जात आहे. परिणामी कृष्णवर्णीय लोकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात हॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार सामिल झाले आहेत. दरम्यान अभिनेता एद्रिस एल्बा याने देखील वर्णद्वेषाच्या काही कटू आठवणी सांगितल्या. प्रसिद्ध अभिनेता असतानाही एद्रिसने अनेक ठिकाणी वर्णद्वेषाचा सामना केला आहे.

द पॅसिफिक रिम स्टार या कार्यक्रमात एद्रिसने वर्णद्वेषावर भाष्य केलं. या आठवणी सांगताना त्याला रडू कोसळलं. तो म्हणाला, “हे खूपच वाईट आहे. आम्ही देखील माणसंच आहोत. पण केवळ रंगामुळे गेले कित्येक वर्ष आम्हाला गुलामांप्रमाणे वागवलं गेलं. या गुलामगीरीचा प्रभाव माझ्या आयुष्यावरही उमटला आहे. मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलो आहे. लहान असताना मी बाबांसोबत काम करायला शेतात जायचो. तिथे आमचा सातत्याने पाणउतारा व्हायचा. आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळायची. पुढे वर्ष सरत गेली पण हा अपमान मात्र थांबला नाही. अगदी अभिनेता झाल्यानंतरही या वर्णद्वेषाने माझी पाठ सोडली नाही. अनेक चांगल्या भूमिका केवळ कृष्णवर्णीय असल्यामुळे मी गमावल्या आहेत.” असा अनुभव एद्रिसने सांगितला.

जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूमुळे अमेरिकेत वातावरण पेटलं आहे. लोक करोना विषाणूची पर्व न करता रस्त्यांवर येऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात घोषणा देत आहेत. या आंदोलनाला शकिरा, टेलर स्विफ्ट, मडोना, लेडी गागा यांसारख्या अनेक मोठ्या हॉलिवूड कलाकारांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सेलिब्रिटींनी तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मतदानच करणार नाही अशी धमकीच द्यायला सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 12:12 pm

Web Title: idris elba says success has not negated racism for me mppg 94
Next Stories
1 अक्षय कुमार आणि सोनू सूदला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, नेटकऱ्यांची मागणी
2 प्रसून जोशींना स्वरा भास्करने दिले उत्तर, झाली सोशल मीडियावर ट्रोल
3 सुशांतच्या अखेरच्या चित्रपटाच्या सेटवरील Video Viral; पाहा त्याचा अनोखा अंदाज
Just Now!
X