News Flash

Coronavirus : करोनाची लागण झाली तर लोकं मरणारच; असंवेदनशील वक्तव्यामुळे अभिनेत्री ट्रोल

या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.

संग्रहित छायाचित्र

देशभरात करोना विषाणूची दहशत पसरली असताना गर्दीत न फिरता घरीच सुरक्षित राहण्याचा संदेश अनेकजण देत आहेत. सामान्यांपासून सेलिब्रिटीसुद्धा घरीच असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच एका अमेरिकन अभिनेत्रीने घरी बसण्यावर संताप व्यक्त केला आहे. या कारणामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली आहे.

अमेरिकन अभिनेत्री वनेसा ह्युजेन्स हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत ती म्हणतेय, “करोना विषाणूचा फैलाव आणि रुग्णांचं विलगीकरण करणं हा मूर्खपणा आहे. हा व्हायरल आहे हे मला माहित आहे. पण जर का प्रत्येकाला त्याची लागण झाली तर लोकं मरणारच आहेत. हे भयानक आहे, पण टाळताही येणारं नाही.” वनेसाच्या या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा : कोणी हात मिळवण्याचा प्रयत्न केल्यास करीना करते ‘हे’ काम

नेटकऱ्यांनी टीका केल्यानंतर वनेसाने रीतसर माफी मागणारा दुसरा व्हिडीओदेखील पोस्ट केला. ज्यामध्ये ती लोकांना घरी राहण्याचा संदेश देताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 1:06 pm

Web Title: if everybody gets corona virus people are gonna die actress trolled for her insensitive comment ssv 92
Next Stories
1 करोनामुळे घरी बसलेला सलमान पाहा काय करतोय?
2 तेरी फॅमिली को मार दूंगा अगर…,’बिग बॉस’ स्पर्धकाच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी
3 हा लोकप्रिय अभिनेता ठरला सर्वांत आकर्षक पुरूष
Just Now!
X