News Flash

प्रियांकाचं ‘अ‍ॅव्हेंजर्स’ होण्याचं स्वप्न भंगलं; सुपरहिरो चित्रपटातून केलं बाहेर

...म्हणून प्रियांका चोप्राला हॉलिवूड चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता

प्रियांका चोप्रा ही एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडसोबतच तिने हॉलिवूड सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. लवकरच ती मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्सच्या चित्रपटांमध्ये देखील झळकणार अशी चर्चा होती. स्वत: प्रियांकाने देखील ‘मिस मार्व्हल’ ही व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे या रोलसाठी तिने ऑडिशन देखील दिलं होतं. परंतु अंतिमक्षणी निर्मात्यांनी प्रियांका ऐवजी अभिनेत्री इमान वेलानी हिची निवड केली आहे. कास्टिंग दिग्दर्शकांनी मिस मार्व्हल ही व्यक्तिरेखा इमान वेलानीच्या पदरात टाकली आहे.

अवश्य पाहा – शौक बडी चीज है! केवळ सेलिब्रिटींना परवडणारी जॅकेट्स

मार्व्हलने आपल्या जुन्या सुपरहिरोंना अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम या चित्रपटातून निवृत्त केलं. आता ते नव्या कलाकारांमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे स्पायडरमॅन, आर्यनमॅन असे सुपरहिरो सोडून आता नवे सुपरहिरो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मिस मार्व्हल ही देखील या नव्या फळीतील सुपरहिरोंपैकी एक आहे. कॉमिक्स स्टोरीलाईननुसार या कॅरेक्टरचं खरं नाव कमला खान असं आहे. पाकिस्तानमध्ये राहणारी ही तरुणी जगाला वाचवण्यासाठी अ‍ॅव्हेंजर्सच्या फौजेत दाखल होते.

अवश्य पाहा – “सरकारी पुरस्कार परत करणार होतीस ना?”; रियाची सुटका होताच स्वराने कंगनाला डिवचलं

स्क्रिन रेंटने दिलेल्या वृत्तानुसार ही व्यक्तिरेखा प्रियांका चोप्राने साकारावी अशी इच्छा मार्व्हलचे सीईओ जो रुसो यांनी व्यक्त केली होती. प्रियांका देखील सुपरहिरोच्या भूमिकेत येण्यासाठी सज्ज होती. तिने ऑडिशन देखील दिलं होतं. परंतु कास्टिंग दिग्दर्शकांना मात्र तिचं काम आवडलं नाही. शिवाय प्रियांका आता ३८ वर्षांची आहे. त्यांना एक तरुण अभिनेत्री हवी जी किमान पुढील १५ वर्ष ही व्यक्तिरेखा सोडणार नाही. त्यामुळे त्यांनी प्रियांका ऐवजी २० वर्षीय इमान वेलानीची निवड केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 1:05 pm

Web Title: iman vellani priyanka chopra ms marvel marvel cinematic universe mppg 94
Next Stories
1 “तुझ्या चित्रपटांमुळे महिलांवरील अत्याचार वाढतोय” म्हणणाऱ्याला मल्लिका शेरावतने सुनावले
2 Spoiler Alert: बिग बॉसमध्ये आज राहुल वैद्य आणि पवित्रामध्ये होणार जोरदार भांडण
3 “माझ्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार आला, पण..”; रिया चक्रवर्तीच्या आईने मांडली व्यथा
Just Now!
X