News Flash

JNU प्रकरणी दीपिकाने पाठिंबा दिल्यामुळे जाहिरात कंपन्या बॅकफूटवर

एका जाहिरातीसाठी दीपिकाचं मानधनं किती माहितीये का?

जाहिराती आणि चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून दीपिका पदुकोणकडे पाहिलं जातं. मात्र सध्या अनेक जाहिरातींच्या ब्रॅण्डने तिच्यापासून चार हात लांब राहणं पसंत केलं आहे. अलिकडेच दीपिकाने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठात हजेरी लावली होती. यानंतर तिच्यावर अनेकांनी टीकास्त्रदेखील डागले. इतकंच नाही तर काहींनी तिच्या ‘छपाक’ या चित्रपटाचाही विरोध करण्यास सुरुवात केली. तिच्याविषयी सुरु असलेल्या या वादामुळेच अनेक कंपन्या सतर्क झाल्या असून त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे.

‘इकॉनॉमिक टाइम्स’नुसार, ज्या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये दीपिका झळकली आहे. त्या कंपन्यांनी त्यांच्या जाहिराती दाखविण्याचं प्रमाण कमी केलं आहे.तसंच येत्या काळामध्ये कलाकारांसोबत कोणताही करार करताना त्यामध्ये एक नवा क्लॉज तयार करण्यात येणार आहे. “सामान्यपणे कोणतीही कंपनी त्यांच्या ब्रॅण्डची गुणवत्ता स्थिर रहावी याचा विचार करत असते. त्यामुळे कोणत्याही वादाचा आपल्या कंपनीला फटका बसू नये यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत असते,” असं कोका-कोला आणि अॅमेझॉन सारख्या कंपन्यांना रिप्रेझेंट करणाऱ्या आयपीजी मीडिया ब्रॅण्डसचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांनी सांगितलं.

वाचा : दीपिकानं नाव बदललं; रणवीर सिंगऐवजी लावलं ‘या’ व्यक्तीचं नाव

“एका ब्रॅण्डने त्यांच्या जाहिरातीत दीपिका असल्यामुळे ही जाहिरात जवळपास २ आठवडे दाखवू नये, असं सांगितलं आहे. तसंच दीपिका जेएनयूमध्ये गेल्यानंतर जो वाद निर्माण झाला आहे. तो वाद शमल्यानंतर ही जाहिरात परत दाखवा”, असं एका कंपनीने आम्हाला सांगितल्याचं ‘मीडिया बाइंग एजन्सी’ने सांगितलं.

वाचा: …तर अमरीश पुरींऐवजी ‘या’ अभिनेत्याने साकारली असती मोगॅम्बोची भूमिका

कोणत्या ब्रॅण्डच्या जाहिरातीत आहे दीपिका?
ब्रिटानिया गुड्डे, लॉरियल, तनिष्क, विस्तारा एअरलाइन्स,अॅक्सिस बॅकसह अन्य २३ ब्रॅण्डसाठी दीपिका जाहिरात करते. त्यामुळे दीपिकाचं नेटवर्थ १०३ कोटी रुपये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिका चित्रपटासाठी १० कोटी आणि जाहिरातींसाठी ८ कोटी रुपये मानधन आकारते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 11:57 am

Web Title: impact on brand deepika padukone after jnu dispute ssj 93
Next Stories
1 ‘छपाक’नं सोडली उत्तराखंड सरकारवर छाप; मेघना गुलजार यांनी केलं निर्णयाचं स्वागत
2 …तर अमरीश पुरींऐवजी ‘या’ अभिनेत्याने साकारली असती मोगॅम्बोची भूमिका
3 दीपिकानं नाव बदललं; रणवीर सिंगऐवजी लावलं ‘या’ व्यक्तीचं नाव
Just Now!
X